आरोग्य व शिक्षण

ग्रुपग्रामपंचायत ताजेच्या वतीने पिंपळोली गावात मोफत लसीकरण मोहीमेचे आयोजन

Spread the love

पिंपळोली : ग्रुप ग्रामपंचायत ताजेच्या वतीने पिंपळोली गावामध्ये मोफत लसिकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला.या मोहिमेअंतर्गत गावामध्ये 200 नागरीकांचे  लसिकरण झाले.

 

या केलेल्या उपक्रमाचे कौतुक ही मोठ्या प्रमाणात झाले. लसिकरणाच्या वेळी लोकांना सकस आहार देण्यात आला. हे एक वेगळेपण यामध्ये दिसुन आले.आहाराचे खास नियोजन सिध्दार्थशेठ चौरे(ग्रा,पं.सदस्य), संदिपशेठ चौरे(मा.उपसरपंच), संतोष बोंबले(शिवसेना विभाग प्रमुख),गणेशशेठ गायकवाड(सदस्य) सुनिलशेठ गुजर(आर टी आय सदस्य) यांनी केले.

 

लसिकरणाला मावळच्या सभापती ज्योति शिंदे यांची खास उपस्थिती लाभली. त्यांच्या सोबत त्यांचे बंधु भवार साहेब उपस्थित होते.सभापतींनी स्वतःयेऊन लसिकरणाचे महत्व सांगुन जनजागृती केली हे विशेष मानावे लागेल. तर लसिकरण ही सध्याच्या घडीला काळाची गरज आहे. प्रत्येकाने लसिकरण केलेच पाहिजे.प्रत्येकाने आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आलेल्या या संकटाला कसे टाळले पाहिजे याचे महत्व सभापतींनी पटवुन दिले.

 

ग्रुप ग्रामपंचायत ताजे च्या वतिने सिध्दार्थ चौरे यांनी सभापतींचे खास आभार मानले. गावासाठी लोकांच्या भावना जाणुन लोकांच्या हितासाठी या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. गावकोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळुन उचललेले हे एक पाऊल आहे त्याला ग्रामस्थांनी खुप चांगली साथ दिली व विश्वास ठेवला त्याबद्दल गावचा व कार्ला आरोग्य विभागाच्या टिमचा मी आभारी आहे यामध्ये सभापतीनी विशेष लक्ष घालुन लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे खास करुन आभार मानतो व डॉ.पोळ  यांचे ही सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले.

पुणे जि.आरटीआय सदस्य सुनिलशेठ गुजर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व लसिकरणाचे महत्व , कशाप्रकारे नियोजन करण्यात आले हे पटवुन दिले. त्यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उदघाटन ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम सुतार व प्रा.माणकु बोंबले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.सरपंच रामदास केदारी, सचिन केदारी उपसरपंच, रेशमा गायकवाड विद्यमान सदस्य, बाळासाहेब पिंपळे(मा.ग्रा.प.सदस्य), बाळासाहेब सुतार (मा.ग्रा.पं.सदस्य) सोपान पिंपळे चेअरमन,अंतु बोंबले, भरतशेठ गायकवाड ,भानुदास येवले ,स्वप्ना बोंबले (आशावर्कर,),वत्सला गुजर (अंगणवाडी मदतनीस),मंगल काटे (आशावर्कर ताजे) श्रीकांत दळवी (मुख्यध्यापक) सोमवंशी  ,नुतन अमोलिक ग्रामसेविका, उपस्थित होते.

यामध्ये विशेष योगदान, संभाजी गायकवाड ग्रा.पं.कर्मचारी भुषण गुजर,विश्वास बोंबले, रोशन पिंपळे,चेतन लोखंडे,ऐश्वर्या शिंदे सुभाष गायकवाड रामदास सुतार, वि. सहकार्य ,मनिषाताई येवले सदस्य,संगिताताई केदारी सदस्य,विकास केदारी सदस्य,गणेश केदारी सदस्य,पिंकीताई बालगुडे सदस्य यांचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!