आरोग्य व शिक्षण

इंग्रज देशात आले पण आपल्यात भांडण लावून गेले , देशाचे दोन तुकडे केले – केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदासजी आठवले

Spread the love

लोणावळा :  इंग्रज देशात आले पण आपल्यात भांडण लावून गेले , देशाचे दोन तुकडे केले . आज आतंकवादी रोज आमच्या देशाच्या सिमेवर घुसखोरी करत आहे. आमचे जवान ,सिमा सुरक्षेचे जवान पोलिस शहीद होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेँद्रजी मोदीजींनी काश्मिरमधे ३७० कलम रद्द करून तेथील विकासाच्या दृष्टीने योग्य पाऊल टाकले आहे, तेथील पर्यटन वाढणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदासजी आठवले यांनी लोणावळा येथे प्रतिपादन केले.

लोणावळ्याचे हद्दीतील भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास सुशोभिकरणाचे कामांचे भूमिपूजन व माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे कामाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांचे हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांचा भारतीय जनता पार्टीचे वतीने , आर.पी.आयचे वतीने तसेच महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचेवतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव ,उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , माजी उपनगराध्यक्ष राजूशेठ बच्चे , श्रीधर पुजारी , सुधीर शिर्के , संजय , नगरसेवक , ललीत सिसोदिया , देविदास कडू, बांधकाम समिती सभापती पूजा गायकवाड , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर, आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आर पी आय महिला आघाडी अध्यक्षा यमुना साळवे, माता रमाई आंबेडकर महिला मंडळ आध्यक्षा अनिता वाघमारे , कमल ओव्हाळ आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच लोणावळ्याच्या माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , सुवर्णा आकोलकर , नगरसेविका अपर्णा बुटाला , गौरी मावकर , जयश्री आहेर,सोजल परमार , बिंद्रा गणाञा, तसेच भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , नगरसेवक ,आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी केंद्रीयसामाजिक न्यायमंञी श्री.आठवले म्हणाले , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ,महात्मा गांधी , आणि संत गाडगेमहाराज यांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे चांगले काम झाले.माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते उद्घाटन झाले. आज माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन व डाॕ.आंबेडकर यांचे पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन केले हे माझे भाग्य समजतो. छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे कामही केल्यास या शहराला चांगल्या प्रकारे आकर्षण प्राप्त होईल. रोप – वे च्या कामासाठी केंद्रातर्फे काही निधी देण्यासाठी बैठकीत चर्चा करतो. पर्यटकाँसाठी येथे आठ सीटचे हँलिकेप्टरची सोय झाली , तर पर्यटकांना पहाता येईल. राज्यसरकारने यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यात पुन्हा भाजप , आर पी आय व शिवसेना यांची सत्ता येईल. त्यासाठी माहाआघाडीसरकार लवकरच कोसळणार आहे,देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा मला विश्वास आहे,आसे आठवले पुढे म्हणाले.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , पाच वर्षाच्या काळात आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या शंभर कोटी निधीतून शहराचा विकास करून दाखवला. बत्तीस कोटीच्या जलशुध्दीकरण प्रकरणाला व आठ कोटी स्मशानभूमिचे कामाला मिळाले. रेल्वेच्यावरील पूल लवकरच काम सुरू होणार आहे, रोप वे साठी निधी मिळाल्यास जगात लोणावळ्याचे नाव उंचावेल. त्यासाठी लोकांनी पुढील येणाऱ्या निवडणुकीत याच टीमला निवडून दिल्यास शहराचा कायापालट होईल. भाजीमंडईला , मटण , व मच्छी मार्केटला बांधण्यासाठी आम्ही आमदारांचे सांगण्यावरून पुन्हा पाठवला आहे .

यावेळी लोणावळा भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंञी आठवले यांचे हस्ते देवून नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई नंदकुमार जाधव यांचा सत्कार माता रमाई आंबेडकर महिला मंडळांच्यावतीने करण्यात आला. तसेच यावेळी आर पी आयतर्फे महिला आघाडी अध्यक्षा यमुना साळवे,अनिता वाघमारे , भावनाओव्हाळ व सुप्रिया माने उपस्थित होत्या .

यावेळी लोणावळा आर पी आयचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे म्हणाले ,नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व टीमने आरपीआयला उपनगराध्यक्ष पद दिलीप दामोदरे यांना दिले . त्यांनी कमी काळासाठी दिलेल्या पदामधे मोठे कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करून इतिहास रचला आहे. कोविड काळातील योध्दा म्हणूनही सुरेखाताई जाधव यांनी कोविड केंद्रातर्फे शेकडो रूग्णांचे प्राण वाचवले आहे. माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे कामाला तीस लाख दिले आहे , हे त्यांचे गौरव करण्यासारखे काम आहे.

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे हस्ते मावळचे भजनसम्राट नंदकुमार शेटे , उत्कृष्ट गायिका आशाताई शेटे आणि भजनी मंडळाचा सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. बांधकाम खात्याचे दत्ताञेय गायकवाड व सौ.मठपती यांचा सत्कार सन्मानचिन्ह देवून करण्यात आला.लायन्स क्लबचे अध्यक्ष सुधीर कदम आणि आमिन वाडीवाला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूञसंचालन आर पी आयचे पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड यांनी केले. आभार उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!