आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिक्षकांना मानवंदना देऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा !!

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा केला.

Spread the love

शैक्षणिक : शिक्षकांना मानवंदना देऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा…                                                           स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा केला.

आवाज न्यूज: राजेश बारणे, तळेगाव दाभाडेे ८ सप्टेंबर.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका  शमशाद शेख मॕडम पर्यवेक्षिका .रेणू शर्मा मॕडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारताचे माजी राष्ट्रपती श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात अनेकविध बदल होत असले तरीही शिक्षक हाच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारा शिल्पकार असतो; त्यांच्या प्रति आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थीवर्गावरती अध्ययनाची जबाबदारी सोपविण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कु.शरयू भोकरे या विद्यार्थिनीने केले.विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शालेय मुख्याध्यापिका, शमशाद शेख मॕडम यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाची कास धरावी; हसत खेळत शिक्षण घ्यावे असे मार्गदर्शन केले.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन केले.शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
नुपूर बागोडी, चैत्राली जगनाडे या विद्यार्थीनींनी शिक्षकाचे महत्व, समाजात असलेली शिक्षकाची गरज याविषयी भाषण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी शरयू भोकरे, खुशबू शर्मा व आभारप्रदर्शन उदिता ढमढेरे, गौरी कदम यांनी केले.

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्षा. रजनीगंधा खांडगे मॕडम,उपाध्यक्ष.दादासाहेब उ-र्हे ,सचिव. मिलिंद शेलार सर,कार्याध्यक्ष. बाळासाहेब शिंदे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!