ताज्या घडामोडी

उत्तर महाराष्टातील अमळनेर येथील साई इंग्लिश अकाडमीच्या उपक्रमात, गुणी विद्यार्थी मौर्विका,अदिती,श्लोक,धनश्री,संकेत यांना यंदाचा “साईरत्न” पुरस्कार जाहीर.

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर-येथील साई इंग्लिश अकॅडमि,
अमळनेर या कोचिंग क्लासेस तर्फे प्रत्येक
वर्षी निवडण्यात येणारा,अत्यंत बहुमानाचा
व इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी
ठरणारा यंदाचा “साई रत्न” पुरस्कार,
रविवार,दि.5 मार्च 2023 रोजी
झालेल्या सोहळ्यात-मौर्विका मिलिंद
वैद्य,अदिती कैलास साळुंके,श्लोक संदिप सुर्यवंशी,धनश्री रविंद्र महाजन,संकेत केशव सैंदाणे
ह्या पाच गुणी विद्यार्थ्यांना देण्यात
आला,सदरील सोहळ्याचे अध्यक्ष-
मा.श्री.शशिकांत पाटील सर
– मोटीवेशनल स्पिकर,सुरत हे होते.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
मा.श्री.ॲड.सारांश सोनार,युवा
वक्ता,अमळनेर.तसेच पारोळा
कोर्टाच्या सरकारी वकील सौ.प्रतिभा
मगर, साई इंग्लिश अकॅडमिचे
कार्यकारी संचालक-भैय्यासाहेब मगर,
तसेच अनेक विद्यार्थी व अनेक पालक
तसेच अकॅडमिचे शिक्षक वृंद यांच्या
उपस्थितीत-मौर्विका,अदिती,श्लोक,
धनश्री,संकेत यांना यंदाचा “साई रत्न”
पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.हुशार
व होतकरू असे मौर्विका, अदिती,
श्लोक,धनश्री,संकेत हे अगदी
सुरुवातीपासूनच साई इंग्लिश
अकॅडमिचे नियमित विद्यार्थी
आहेत.तसेच अमळनेरातील साने
गुरुजी कन्या हायस्कुल,डी.आर.कन्या
हायस्कुल,जी.एस,हायस्कुल,
साने गुरुजी नूतन हायस्कुलचे
विद्यार्थी आहेत.पॅनल द्वारा मुलाखत
घेऊन ‘साई रत्न’ निवडणारा
साई इंग्लिश अकॅडमि हा संपूर्ण
महाराष्ट्रातील कदाचित एकमेव क्लास
अशी ओळख,याचा आम्हाला सार्थ
अभिमान आहे,असे साई इंग्लिश
अकॅडमि संचालक-भैय्यासाहेब मगर
यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!