ताज्या घडामोडी

आगरनरळ केंद्राची शिक्षण परिषद शैक्षणिक कृती उपक्रमांनी संपन्न

Spread the love

केंद्रप्रमुखांनी केले यशस्वी नियोजन

जाकादेवी/वार्ताहर -रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ केंद्रशाळेत शैक्षणिक विविध विषयांवर महत्वपूर्ण शिक्षण परिषद केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे यांच्या अध्यक्षतेखाली कृती उपक्रमांनी व विविध विषयांवर शिक्षक तज्ञांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, माजी केंद्रप्रमुख अनिल पवार, कोळीसरे कोठारवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तांबे, देऊड गावातील शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चव्हाण, आगरनरळ शाळेचे शिक्षक विलास पानसरे इ. नी नियोजित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून शिक्षण परिषदेचा उद्देश सफल केला.या शिक्षण परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य व युवा नेते अभय खेडेकर, आगरनरळ गावच्या सरपंच सौ. अनुष्का खेडेकर यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. या शिक्षण परिषदमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या देऊड लावगणशाळा नं.१ शाळेच्या शिक्षिका सौ.करुणा शेवडे ,माजी केंद्रप्रमुख अनिल पवार, युवा नेते अभय खेडेकर इ. चा आगरनरळ केंद्रातर्फे प्रेरणादायी सत्कार करण्यात आला.या शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावरील तज्ञ शिक्षकांनी अतिशय बहुमोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी अभय खेडेकर व सरपंच सौ. अनुष्का खेडेकर यांनी शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करताना म्हणाले की,शैक्षणिक कामासाठी काही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास आम्हाला मनमोकळेपणाने सांगाव्यात, अडचणी दूर करण्याचे आश्वासन श्री.सौ.खेडेकर यांनी उपस्थित शिक्षकांना दिले.यावेळी अभय खेडेकर यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कामगिरीचा आपल्या भाषणातून गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालनत्रसंचलन व आभार आगरनरळ केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजीव दर्डी यांनी केले. शैक्षणिक उपक्रम चर्चा, अंमलबजावणी व शाळा पूर्वतयारी या संदर्भात प्रकाश कळंबटे यांनी उपस्थित शिक्षकांना अतिशय मोलाचे माहिती दिली.अशाप्रकारे उत्साहाच्या वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.शिक्षण परिषदेचा प्रारंभ शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने परिपाठ सादर करुन केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!