ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी इस्लामपूर शहरात

Spread the love

इस्लामपूर दि.१५ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी इस्लामपूर शहरात येत आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संवाद यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील मा.जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी वाळवा पंचायत समितीसमोर संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येईल. तेथून शहराच्या मुख्य मार्गावरून मोटार सायकल रॅलीने कचेरी चौकात यात्रा येईल. येथे छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर यात्रा मा.जयंत पाटील खुल्या नाट्य गृहाकडे जाईल. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,मंत्री,विविध सेलचे राज्य अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
ना.जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
त्यातील एक परिवार संवाद यात्रा आहे. गड चिरोली या आदिवासी भागातून दि.२८ जानेवारी रोजी सुरू झालेल्या संवाद यात्रेने संपूर्ण राज्य पादाक्रांत केले आहे. ही यात्रा कोकण भाग,सातारा जिल्ह्यातून इस्लामपूर ला येणार आहे. पूर्वी पक्षाच्या संघर्ष यात्रेचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जोरदार स्वागत केले होते. यावेळी मा.जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात झालेली जाहीर सभा विक्रमी गर्दी व मोबाईल टॉर्च फोटोने राज्यात गाजली होती. तसेच संवाद यात्रेचे स्वागत आम्ही करणार आहोत.
युवा नेते प्रतिकदादा पाटील,राजवर्धन पाटील (भैय्या),प्रा.शामराव पाटील, अँड.चिमनभाऊ डांगे,बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव,सुनीता देशमाने,कमल पाटील,रोझा किणीकर,संग्राम जाधव,देवराज देशमुख, सचिन कोळी,प्रकाश रुकडे,शिवाजी चोरमुले,तेजश्री बोंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिवार संवाद यात्रेची जोरदार तयारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!