ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कार्याबद्दल मयुरेश माने यांना मायक्रोसॉफ्टचा MIE EXPERT हा बहुमान दुसऱ्यांदा जाहीर

Spread the love

मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या बहुमानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दहिवली बु.।। येथील रत्नाकर शिक्षण संस्था संचलित रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.।। मधील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही सहा. शिक्षक मयुरेश माने यांची या बहुमानासाठी यावर्षी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला नव्याने वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने हा बहुमान दिला जातो.
मयुरेश माने यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने अध्यापन कार्यात नाविण्यता आणण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर Flip, WAKALET, चा वापर करून अध्यापन रंजक केले आहे. या मेहनती व तज्ज्ञ शिक्षकाला मिळालेल्या या बहुमानामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मयुरेश माने हे माध्यमिक तंत्रस्नेही समुह महाराष्ट्र* *TSTSMAHARASHTRA चे सक्रीय सदस्य आहेत. या समूहाच्या माध्यमातून असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात..देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे. मयुरेश माने यांनी मागील वर्षी आपल्या शाळेत राबवलेल्या RISEUP4EWASTE या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाने जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रकल्पाचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच पार पडणार आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातील केवळ १७ शाळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीन शाळांनी सहभाग घेऊन योगदान दिले होते. यावर्षी ही ROAD TO RECOVERY हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प माने आपल्या शाळेत राबवत आहेत. हा प्रकल्प कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे शालेय स्तरावरील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयाशी निगडीत आहे. या मेहनती व तज्ज्ञ शिक्षकांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मयुरेश माने यांचे KONKAN TECHSUPPORT हे शैक्षणिक युट्यूब चँनेल सुरू आहे. याचे एक हजारांहून जास्त SUBSCRIBER आहेत. तसेच जवळपास १०० व्हिडीओ सध्या उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक लक्षवेधी अशी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वृत्तीला वाव देण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपक्रशील शिक्षक मयुरेश माने यांनी केले आहे.. यावेळी रत्नाकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरीता घाग, सचिव हेमकिरण घाग, व इतर संस्था सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश पांडुरंग भंडारी व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!