ताज्या घडामोडी

बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद खंडाळा संघटनेतर्फ उद्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

Spread the love

दुकानदार -विक्रेते स्टॉल खुले राहणार

जाकादेवी /वार्ताहर :-रत्नागिरी तालुक्यातील बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहार येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव १४ एप्रिल रोजी बावीस खेडी संघटनेचे अध्यक्ष सुनिल उर्फ भाई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सकाळी १०.३० वा. ध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ, तसेच रात्री ८.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर जाहीर सभा तर रात्री ११ वा. गणेश हिर्लेकर लिखित अमरदान (वाटद-पश्चिमतर्फे )हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तरी या जयंती महोत्सवाला २२ गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.हा जयंती महोत्सव अतिशय थाटात संपन्न करण्यासाठी २२ खेडी बौद्धजन संघटनेचे आजी-माजी कार्यकारणी, पदाधिकारी, सामाजिक- धार्मिक कार्यकर्ते ,हितचिंतक, महिला मंडळ, तरुण वर्ग अतिशय उत्साहाने मेहनत घेत आहेत.
कोरोना संसर्गानंतर दोन वर्षानंतर हा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी भीम अनुयायांमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे .या जयंती महोत्सवाला समाजातील मान्यवर, संघटनेचे पदाधिकारी, गावावर प्रतिनिधी, महिला,तरुणवर्ग, बुद्ध,शिवराय,फुले,शाहु आंबेडकरी विचारधारेचे बहुसंख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. २२ खेडी संघटनेचा हा जयंती महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यासाठी भीम अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बावीस खेडी बौद्धजन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.जयंतीदिनी परिसरातील छोटे मोठे व्यवसायिक, वस्तू विक्रेते यांनाही प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दीक्षाभूमी परिसरात परवानगी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!