ताज्या घडामोडी

सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम

Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त आर,के, डिजिटल केबल आणि के,टीव्ही न्यूज तर्फे संचालक रज्जाक काझी आणि वृत्त संपादक अलिमिया काझी यांनी *सन्मान नारी शक्तीचा* या मानाच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य,राजकीय,क्रिडा आणि पत्रकारीता ईत्यादी श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार 2022 देऊन सन्मानित केले जाणार आहे

,उत्कृष्ट मोमेंटो, सन्मानपत्र, शाळ आणि श्रीफळ तसेच अरिहंत ग्रुपचे प्रमुख सुरेशशेठ गुंदेजा यांच्या कडून गिफ्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.पुरस्कार प्राप्त महिलांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ,बी, एन,पाटील,रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, ईंदुराणी जाखड,माजी आमदार हुस्नबानु खलीफे,रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन,सिव्हिल सर्जन डॉ, संघमित्रा फुले,ईन्फिगो आय केअर चे संचालक डॉ,श्रीधर ठाकुर,अनुजा राजन साळवी ,कोकण बंकेच्या व के,टीव्ही च्या संचालिका फरीदा रझ्झाक काझी,प्रसिद्ध उधोजक सुरेश गुंदेजा शिरगाव ग्रामपंचायत माजी सरपंच रहिमत अलिमियां काझी आदी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार प्राप्त महिला खालील प्रमाणे
=============
1- *रितु प्रकाश छाब्रिया- आरोग्य, शिक्षण व सामाजिक*
2 – *उर्मिलाताई उल्हास घोसाळकर- पत्रकारीता व सामाजिक*
3 – *सिमा अभिजित हेग्शेट्ये- शिक्षण*
4- *अनघा योगेश मगदूम-पत्रकारीता*
5 – *वैभवी विजय खेडेकर- राजकीय व सामाजिक*
6 – *मेहरून हमीद नाकाडे- पत्रकारीता*
7- *प्राची शिंदे – सामाजिक*
8- *निकिता जगताप – सामाजिक*
9 – *ऐश्वर्या सावंत – क्रीडा क्षेत्र*
10 – *सुरेखा पाथरे – आरोग्य व सामाजिक*
11 – *राधिका राकेश चव्हाण – सामाजिक*
============

*गुरूवार दिनाक 10 मार्च रोजी, सायंकाळी 5 वाजता जयेश मंगल पार्क थिबापलेस रोड रत्नागिरी येथे *जागर नारी शक्तीचा* या कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहेत.

*सदर कार्यक्रमाचे आर,के,केबल,युट्यूब व फेस बुकवर थेट प्रसारण (LIVE) केले जाणार आहे,जेणे करून देश विदेशातील लाखो जणांना हा कार्यक्रम पाहता येईल,या कार्यक्रमात महिला नमन खेळे,नूत्य,डान्स गाणी ईत्यादी करमणूक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत,तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे,ही विनंती

*के टीव्ही न्यूज रत्नागिरी*
09/03/2022

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!