आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन व माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन

Spread the love

लोणावळा :  भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन व माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन ता.५ रोजी मान्यवरांचे हस्ते दुपारी होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय  मंञी  रामदास आठवले यांचे हस्ते व राज्याचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांचे आध्यक्षतेखाली होणार आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील डाॕ.बाबासाहेब डहानूकर हाँस्पिटलसमोर असलेल्या भारतरत्न , घटनेचे शिल्पकार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन व माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (पाटील) ,सार्वजनिक बांधकाम व मृदू व , वन व पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास मंञी .दत्ताञेय भरणे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार सुनिलआण्णा शेळके , आमदार श्री.संजय जगताप , आर.पी.आय पुणेजिल्हा आध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , माजीमंञी श्री.संजय तथा बाळा भेगडे , आदी उपस्थित राहणार आहे, असे लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्री.दिलीप दामोदरे आणि मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे. कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!