ताज्या घडामोडी

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त इस्लामपूर येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन

Spread the love

इस्लामपूर दि.१४ प्रतिनिधी
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त इस्लामपूर येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सच्चे देशभक्त होते. त्यांनी सातत्याने आपला देश व देशाच्या भवितव्याचा विचार केला आहे. त्यांनी केवळ देशातील दलितांचा उध्दार केला नसून समाजातील शेतकरी,महिला,कामगार आदी घटकांच्या उन्नतीसाठीही कष्ट घेतले असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,माजी नगराध्यक्ष अँड.चिमनभाऊ डांगे,राज्य सरचिटणीस अरुणभाऊ कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी तसेच समता सैनिक दलाचे स्वयंसेवक उपस्थित होते.इस्लामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.शामराव पाटील,अरुण कांबळे, अँड.चिमण डांगे, विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील,सुभाषराव सुर्यवंशी व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!