आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिकणार || भोई प्रतिष्ठान चा पुण्यजागर ||

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून शैक्षणिक पालकत्व प्रकल्प पुण्यजागर सुरू आहे

Spread the love

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिकणार ||
भोई प्रतिष्ठान चा पुण्यजागर ||

आवाज न्यूज २१ जुुुलै: पुणे प्रतिनिधी,

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून शैक्षणिक पालकत्व प्रकल्प पुण्यजागर सुरू आहे ..या अंतर्गत अर्धापूर परिसरातील बावीस मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारलेले आहे.

आज जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनात आणि सक्रिय सहभागात हा उपक्रम सुरू आहे. यंदापासून या प्रकल्पातील सहा विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यनगरीत येत असून त्यांच्या आयुष्यातील या अनोख्या संधीचा शुभारंभ नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक न म जोशी सर ,शिक्षणतज्ञ डॉ.रवींद्र वंजारवाडकर,बँकिंग तज्ञ बाळासाहेब अनास्कर,निवृत्तएअरमार्शल भुषण गोखले,, शिक्षण तज्ञ डॉ.सुधाकर जाधवर, फुलचंद चाटे ,उद्योजक दादा गुजर ,सुरेश कोते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या प्रकल्पातील इयत्ता 6वी तील विद्यार्थिनी दुर्गा क्षीरसागर ने मनोगत व्यक्त करताना आम्हाला वडील नाहीत आणि आता आई पासून लांब राहून आम्ही शिकायला सुरुवात करत आहोत. आम्ही जिद्दीने शिक्षण घेऊन या देशाचे जबाबदार नागरिक बनू आणि कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही असं काम करू असे म्हणतात उपस्थितांचे डोळे पाणावले.
या कार्यक्रमाचे संयोजक पुण्यजागर प्रकल्पाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण प्रवासात पुणेकरांनी दिलेले योगदान अनमोल असून पुण्यातील शिक्षणामुळे या मुलांचे भवितव्य उज्ज्वल असेल असा विश्वास व्यक्त करून या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे सांगितले.

सासवड जवळील वीर या गावातील अस्तित्व गुरुकुल या संस्थेत ही मुले शिकणार असून या शाळेच्या संचालिका कु. गीता देगावकर यांनी या मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू असे सांगितले .भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्पाचे नांदेड येथील समन्वयक  लक्ष्मीकांत मुळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!