ताज्या घडामोडी

आगामी निवडणुकीत रिपाइंचे प्रतिनिधी निवडून आना : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Spread the love

कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरूडकर) :

चाफोडी (राधानगरी) गावच्या सरपंच पदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वत्सला नामदेव कांबळे यांची बिनविरोध निवड झाले बद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कोल्हापूर रिपाइंचे जिल्हा नेते सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली. रिपाइंचा सरपंच झाले बद्दल आठवले यांनी आनंद व्यक्त केला. नवनियुक्त सरपंच यांचा आयु. साताप्पा कांबळे चाफोडीकर यांच्या करवी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडी कामी रिपाई (आठवले) जिल्हा नेते आयु. सतिश माळगे व राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे, आयु साताप्पा कांबळे चाफोडीकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बाजवले बद्दल त्यांचेही कौतुक केले. चाफोडीसारखीच पुनरावृत्ती आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातुन करा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुढील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी आपल्या खासदार फंडातून भरीव निधी देऊ असेही कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.
या सदिच्छा भेटीत नेर्ली ग्रामपंचायत सदस्य प्रदिप ढाले, कागल तालुका आयु. रमेश कांबळे, प्रविण निगवेकर, सनी कांबळे नागावकर, निलेश बावडेकर, सलमान मौलवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!