आरोग्य व शिक्षण

हिंदु समितीतर्फे लोणावळ्यात भव्य शोभायाञा संपन्न

Spread the love

लोणावळा : हिंदु धर्म की जय ! प्रभु श्रीरामचंद्र की जय ! ! छञपती शिवाजी महाराज की जय ! ! जय भवानी ! ! जय शिवाजी ! ! भारतमाता की जय ! ! ! अशा घोषणा , फटाक्यांची आतषबाजी , भगवे फेटे , भगवे ध्वज हातात व मोटारसायकस्वार अशी , भव्यदिव्य शोभायाञा लोणावळ्यात संपन्न झाली.

सकाळी नऊ ते दुपारी अडीच ते तीन पर्यत ही शोभायाञा डाॕ.पुरंदरे मैदान ते नांगरगाव अशी शहरभर काढण्यात आली. सांगता समारंभात नांगरगाव येथे पुण्याचे माजी नगरसेवक व हिंदु निष्ट श्री मिलींद एकबोटे यांनी सांगता समारंभात सांगितले , या आजच्या पविञ गुढीपाडव्यानिमित्त हजारो हिंदू बंधू भगीनी यांनी या रॕलीत सहभागी होऊन भगवा पविञ ध्वज अंगा खांद्यावर मिरवला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या जागतिक धर्मपरिषदेमधे जगाला सांगितले की , आमचा हिंदु धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. गर्व से कहो हम हिंदु है ! ! असे सांगायला ते विसरले नाही.आपल्या पूर्वज ,पराक्रमी राजे , महाराजे , साधू , संत , ऋषी मुनी यांनी सांगितले की हिःदुधर्म सर्वश्रेष्ठ आहे. इपण सर्वजण या पविञ शोभायाञेत सहभागी झालात , त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ! असेच कार्य पुढे चालू ठेवावे , छञपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात संतप्त झाल्याबद्दल त्यांना तीन महिने कैद केले. अशा औरगजेबाच्या पोलादी पंजातून सुखरूप शिताफीने निसटले , छञपती धर्मवीर शंभूराजे यांनी औरंगजेबाने चाळीस दिवस हालहाल केले,डोळे काढले,अंगाची सालटी काढली तरीही न डगमगता त्यांनी औरंगजेबाचा आत्यंत शेलक्या भाषेत सर्व सहाशे सैन्यासमोर अपमान केला.सूअर के पिल्ले अशी उपमा देवून उपमर्द केला.त्यांना त्याच्या सरदाराने दिलेल्या आॕफर झिडकारून लावत मृत्यूला हसत हसत सामोरे गेले. सहा मिने मराठ्यांचे पराक्रमी विरांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधायला लावली.., हिंदुत्वाचा झेंडा आसाच खांद्यावर घेतला तो फडकत राहावा , देशात राजकारणाची दुष्ट पिलावळ तयार झाली आहे , हिंदुंच्या नादी लागणाऱ्या , भारताच्या नादाला लागणाऱ्यांना गाडल्याशिवाय हिंदूशक्ती गप्प बसणार नाही.

या रॕलीत सूञसंचालन बाळकृष्ण बलकवडे सर , आणि आभार आनंद गावडे सर यांनी केले. या रॕलीत चंद्रकांत गाडे ,सुनिल गायकवाड , दिपक कांबळे , राम दुर्गे , प्रकाश काळे ,अनिस गणाञा , बाबुजी तथा नंदकुमार वाळंज , बंडु कुटे ,आदी शेकडो मान्यवर उपस्थित होते.

अनेक वाहनचालक कुटूंबातील महिला , मुले , मुली यांना घेऊन शोभायाञेत सहभागी झाले होते. हुडको काॕलनी येथील हनुमान मंदिराजवळ रामदेवबाबा भक्त मंडळाने व श्री शिवाजी मिञ मंडळांच्यावतीने हजारो हिंदुसमितीमधील सदय्य यांना थंडगार सरबत वाटप केले. यावेळी दोन्ही मंडळांच्यावतीने पदाधिकारी शिवाजी मिञ मंडळाचे संस्थापक प्रकाश चव्हाण , राजूशेठ चौहान, प्रकाश दादा जैन , श्री. टाटीया , सुनिल चोरडीया , उपस्थित होते. शोभायाञा भांगरवाडी श्रीराम मंदिराजवळ आल्यावर माजी नगरसेवक दत्ताञेय येवले व सहकारी यांनी छञपतींचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर ओळकाईवाडी काॕर्नरमार्गे कैलासनगर , तसेच वर्धमान सोसायटी , पोलिस स्टेशनकडून लोणावळा छञपती शिवाजी महाराज चौक , जयचंद चौक , भगवान महावीर चौक , खंडाळा बाजारपेठ , वळसा घालून परत भगवान महावीर चौक,मिनुगॕरेज चौक ते इंदिरानगर , तुंगार्ली , नारायणीधाम , कैवल्यधाम , मार्गे वलवण , वरसोली टोलनाका , वलवण गाव , नांगरगाव येथील श्री गणेश मंदिर येथे शोभायाञा सांगता झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!