आरोग्य व शिक्षण

लोणावळा नगरपरिषद समृद्धी गुढीचे आमदारांचे हस्ते उद्घाटन

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद इमारतीचे समोर उभारण्यात आलेल्या गुढीचे उद्घाटन व एक रोप लावून हा नववर्षाचे निमित्ताने समाजातील लोकांना भूमि , जल, आग्नि , वायू आणि आकाश या पाच तत्वाचे रक्षण करा व वसुंधरा वाचवा , आसा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली असून , येथे भारतीय संविधान कोरीव शिल्पाजवळ एक रोपाचे वृक्षारोपन आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी सोमनाथ जाधाव , माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे , विलासभाऊ बडेकर , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक जीवन गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ बोराटी , महिला पदाधिकारी मंजुश्री वाघ , माजी नगरसेविका आरोही तळेगावकर , प्रांतिक सदय्य बाळासाहेब पायगुडे , राष्ट्रवादी युवकचे सनी पाळेकर , पदाधिकारी धनंजय काळोखे , उद्योजक अविनाश ढमढेरे आणि व्यापारी , नागरिक , नगरपरिषद अभियंते दत्ताभाऊ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मावळचे आमदार शेळके यांनी उपजिल्हा रूग्णालयाचे प्रगतीपथावर सुरू आसलेल्या बांधकामाचे ठिकाणी जावून पाहणी केली व ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या. अनेक प्रश्नाबाबत आमदारांनी लक्ष्यवेदी सूचना माडल्या व प्रश्न उपस्थित केल्याने मावळातील विविध गावांसाठी तसेच लोणावळ्याच्या खंडाळा तलावासाठी भरीव निधी आणला असल्याचे शेळके म्हणाले.त्यांनी यावेळी अनेक नागरिकांकडून निवेदने तसेच तक्रार अर्ज घेवून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.काही प्रश्न मार्गी लावले.घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांची प्रश्नांची सोडवणूक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!