आरोग्य व शिक्षण

लोणावळा वॅक्स म्युझीयम आणि शिवशाही संग्रहालयास राजासिह ठाकूर यांची सदिच्छा भेट

Spread the love

लोणावळा : लोणावळा येथील वॅक्स म्युझीयम आणि शिवशाही संग्रहालय यास हैदराबादचे आमदार राजासिह ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली.दोन्ही संग्रहालये पाहून राजाभैया यांनी समाधान व्यक्त केले. “शिवशाही संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू व शस्र समजली तसेंच लोणावळा वैक्स म्यूसियम पाहून भारताच्या ऐतिहासिक पुरुषांचे प्रत्यक्ष दर्शन झाले” असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर प्रसंगी पुणे जिल्ह्यातुन जमलेल्या लोकांना मार्गदर्शन करताना त्यांनी “अधिकाधिक लोकांनी या संग्रहालयांना भेटी द्याव्या व आपला वैभवशाली इतिहास समजून घ्यावा” असे आवाहन  केले.
आमदार राजाभैया यांना भेटण्यासाठी मावळातील तरुणांनी गर्दी केली होती.

डॉ. प्रमोद बोराडे या प्रसंगी म्हणाले, “या ऐतिहासिक वस्तू आणी शिवकालीन शास्रास्रे आपल्या मावळ तालुक्याच्या तसेंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागातून संग्रहित झालेल्या असून सर्वांनी हा युद्धसंग्रह जरूर पाहावा. तसेंच मावळ तालुक्यातील हे एकमेव ऐतिहासिक संग्रहालंय असल्याने सर्व मावळ वासियांनी आधी याच्या दर्शनास यावे असे आवाहन मी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!