ताज्या घडामोडी

अशी आंदोलने वैयक्तिक स्तरावर नकोत….!

Spread the love

शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न, घरावर दगडफेक चप्पलफेक ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील दुर्दैवी म्हणावे लागेल. कुणीही शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करणार नाही. महाराष्ट्राची ती संस्कृतीही नाही. पण हे का घडलं याचे विश्लेषण झालंच पाहिजे.अनेक राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आंदोलन करतात पण अलीकडे ही आंदोलनं अगदीच वैयक्तिकस्तरावर आली आहेत. एसटी कर्मचार्‍यांचे गेले सहा महिने आंदोलन सुरू आहे. त्यांचे समाधान होईल असे निर्णय झालेले नाहीत. खरतर न्यायालयाचे निर्णय सरकार आणि आंदोलक सर्वांवर बंधनकारक आहेत.तसेच न्यायालयाचे निर्णय सर्वांनीच पाळले पाहिजेत.तसेच सर्वांवर अविश्वास दाखवून, वागून चालणार नाही. कुठेतरी विश्वास ठेवलाच पाहिजे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर कायम असले, तरी त्यांनी आपल्या आंदोलनाचा फेरविचार करायला हवा, असं या आंदोलनाशी आणि सरकारशी संबंधित नसलेल्या प्रवाशांचे मत आहे . सोशल मीडियातून या प्रकारची पोस्टही येत असतात. केवळ एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देऊन सर्व सुविधा देणार मग इतर महामंडळातील कर्मचार्‍यांचे करायचं काय?असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच हा सारा भार पेलण्याची सरकारची क्षमताही नाही.तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर समिती नेमली गेली. या समितीनेही असाच अहवाल दिला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचार्‍याच्या बाबतीत निर्णय देताना नेहमीच सहानुभूतीचे धोरण ठेवलं आहे. अंतिम निर्णय देताना त्यांनी आत्महत्या हा मार्ग नाही असेही सूचित केलं. न्यायालयाने कामावर हजर होण्यासाठी कर्मचार्‍यांना अवाहन केले. खरं तर यानंतर तरी आंदोलन संपेल अशी अपेक्षा होती. पण भलतंच आणि अनपेक्षित घडलं. सरकार पक्षातील अनेक जणांना एसटी कर्मचारी इतके आक्रमक होतील असं वाटलं नाही. अनेकदा असे प्रसंग येतात की तुम्ही निर्णय घेण्याच्या क्षमते पलीकडे जाता. एसटी प्रकरणात सरकारचीही हतबलता पहिल्या दिवसापासून दिसून आली आहे. आता सरकार पक्षाचे म्हणणे आहे कामगारांना त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण करू हिंसाचाराला बळी पाडलं. तपासात काय ते पुढे येईल. या सर्व घटनांमध्ये पोलीस खात्यातील गुप्तचर विभागाचे अपयशही पुढे आलं आहे. एका नेत्याच्या घरावर हल्ला हे एकाएकी घडू शकत नाही. निश्चित त्याचं नियोजन झालं आहे. वेळही नेमकी दुपारची साधली गेली. प्रसार माध्यमांचे कॅमेरे उपस्थित राहिले. आंदोलन स्थळापासून शरद पवार यांचे घर काही अंतरावर आहे.तसेच तिथपर्यंत हे सारे आंदोलक जाईपर्यंत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा काय करत होती.असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच आंदोलकांच्या हालचाली काय आहेत यावर बारीक लक्ष ठेवणारी मंडळी काय करतात.तसेच प्रसारमाध्यमांना निरोप जातात पण पोलिसांना माहिती कळत नाही.हे काय गौडबंगाल आहे.पोलिसांची यंत्रणां नेहमीच बातम्या काढण्याबाबत तत्पर आहे, असं सांगितल जातं. गेल्या 3 महिन्यात दोन मोठी अशी आंदोलने झाली त्याची माहिती गृहखात्याला आधी मिळू शकली नाही. काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यावेळी या सार्‍यांचा खापर भाजपावर फोडण्यात आले.तसेच आता गुणरत्न यांच्यावर फोडण्यात येत आहे.तसेच अशी ढकलाढकली करून चालणार नाही.तसेच लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणीही, कधीही प्राधान्य देऊ नये.तसेच त्याचं समर्थनही करू नये. हे तर राजकारणात सतत चालत असते खरंतर शासकीय मुद्द्यांवर असलेला विरोध हा शासकीय कार्यालयापर्यंत सिमीत असला पाहिजे. तो वैयक्तिक स्वरूपात असू नये. एस टी कामगारांचा आक्रोश एक वेळ समजून घेता येईल पण त्यावेळी महिलांनी केलेली विधानं मुळीच समर्थनीय नाहीत.अशी विधान करणे योग्य नाही.

लक्ष्मण राजे
मीरा रोड
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!