ताज्या घडामोडी

पावस विद्यामंदिरमध्ये हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

पावस :–रविवार, दिनांक 30 जानेवारी, 2022 रोजी स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर ,पावस येथे महात्मा गांधी स्मृतीदिन तथा हुतात्मा दिन संपन्न झाला. या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बी.बी.मानेसर यांनी गांधीजींच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. कलाविहार मंडळाचे सभापती श्री.व्ही.बी. काटेसर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश गांधीजींचे शिक्षणाविषयीचे विचार शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पर्यवेक्षक श्री.बी.बी. मानेसर यांनी गांधीजींचे शिक्षण विषयक योगदान यावर आपल्या ओघवत्या वाणीत मार्गदर्शन केले. प्रशालेचे शिक्षक व संस्था सचिव श्री. हरीश सामंत यांनी गांधीजींच्या राष्ट्राप्रती योगदानाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना संस्था, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आदरांजली अर्पण केली आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .त्यानंतर

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गावडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व्हाट्सअप ग्रुप वरून सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधला प्रत्येक विद्यार्थ्याने गांधीजीप्रती आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने आजच्या दिवसात इयत्ता नुसार पुढील प्रमाणे एक तरी कृती करावी असे इ.5 वी.ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.तसेच वर्गनिहाय उपक्रम दिले आहेत.
1) इयत्ता 5 वी, 6 वी – घर व परिसराची स्वच्छता करावी.
2) इयत्ता 7 वी, 8 वी – स्वावलंबन- स्वतःची कामे स्वतः करावी व इतरांना मदत करावी.
3) इयत्ता 9 वी ते 12 वी – सत्कर्म करावे तसेच स्वतःच्या हस्तकौशल्यातून टाकाऊ वस्तूंपासून एक तरी टिकाऊ वस्तू तयार करावी.
सर्व विद्यार्थ्यांनी आपण केलेल्या कामांच्या नोंदी करून संबंधित वर्गशिक्षकांना दाखवाव्यात शक्य असल्यास एक दोन मिनिटांचा व्हिडिओ करून आपल्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकावा असे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!