आरोग्य व शिक्षण

सांगली जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Spread the love

सांगली, दि. 30, (दिलीप जाधव ) : राज्य शासनाकडील दि. २० जानेवारी २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे अगर बंद ठेवण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत व कोविड पॉझीटीव्हीटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने व वेगाने होणारी वाढ पाहता कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी काही बाबी वगळता सांगली जिल्ह्यात इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळा दि. 31 जानेवारी 2022 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
*तथापि गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 च्या RTPCR व RAT तपासणीचा पॉझीटीव्हीटी दर स्थिर आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.*
*या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी एक फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.*

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना covid-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. शाळा सुरु करत असताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ( दोन्ही मात्रा) झालेले असणे बंधनकारक आहे. याबरोबरच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत . सर्व शिक्षण अधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.दि 1 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे .
शाळा सुरू करत असताना शासनाने वेळोवेळी संदर्भातील परीपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!