ताज्या घडामोडी

शिराळा येथील गोरक्षनाथ मंदीर परिसरात विठ्ठल रूक्मिणी मुर्तींची प्राण प्रतिष्ठापना…कोडोली येथील कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ मंदीराची उभारणी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील गोरक्षनाथ मंदीराच्या परिसरात विठ्ठल-रूक्मिणी मंदीराची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये विठ्ठल रूक्मिणी मुर्तींची प्राण प्रतिष्ठापना तसेच कलशारोहण करण्यात येणार आहे.
कोडोली ता. पन्हाळा येथील कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ या मंदीराची उभारणी करण्यात आली आहे.
तर मूर्ती स्थापना करणारे भारत पाटील हे निर्मलग्रामचे प्रणेते असून देशपातळीवर त्यांनी स्वच्छ भारत अभियानात पूर्वीदेखील वेगवेगळ्या राज्यांना निर्मलग्राम बाबत प्रबोधन करून स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिले आहे. पन्हाळा पंचायत समिती सभापती तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पदी उल्लेखनीय काम केले आहे. तसेच प्रतिशिवाजी रुप घेतलेल्या वीर शिवा काशीद यांनी स्वतःचे बलिदान देत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले त्या वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण हि भारत पाटील यांनी केले असून त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यादेखील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य होत्या.
भारत पाटील यांनी गोरक्षनाथ मंदीराच्या परिसरात त्यांचे वडील स्वर्गीय ए डी पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिर स्थापन केले आहे. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. व्यसनमुक्ती, प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरण रक्षण अशा कामाबरोबरच वृक्षारोपण मोहीम अशी कामे राबवित परिसरातील अनेक मंदिरांचे सुशोभीकरण या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!