ताज्या घडामोडी

सरुड परिसरात बीएसएनएलची बोंबाबोंब ……!

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)

सरुड परिसराला वारंवार बीएसएनएलची बोंबाबोंब असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसापूर्वी 3 दिवस रेंज नव्हती पुन्हा एकच दिवस रेंज आली. पण पुन्हा रेंज गायब झाली आहे. आता कोतोली ते तुरुकवाडी दरम्यान केबल तुटली असल्याचे सांगितले जात आहे. बांबवडे येथून सरुड फक्त 4 कि. मी. आहे. परंतु वाई वरून सातारा केल्याचा प्रकार सरूड परिसरात आहे. वास्तविक बांबवडे येथून लाईन जोडणे आवश्यक होते. परंतु मलकापूर -अमेणि- शित्तूर वरूण -कापशीमार्गे सरुडला लाईन जोडण्यात आली आहे. यामुळे येथे येणारी लाईन वारंवार तुटत असल्याचे दिसून येत. परंतु बीएसएनएलचे अधिकारी मात्र एकमेकांवर बोट दाखवून हात झटकत असल्याचे दिसत आहे. अधिकार्‍यांच्या बेजबादार कारभारामुळे सरुड परिसरातील बीएसएनएलच्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या कार्डांना पसंती दिली आहे.मग अधिकारी काय कामाचे? असा प्रश्न ग्राहकांतुन केला जात आहे. बीएसएनएल हे केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. जर अधिकार्‍यांनां योग्य सेवा देता येत नसेल तर त्यांनी खुर्ची कशाला अडवून ठेवली आहे? असा सवाल करण्यात येत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न काममचाच निकाली काढावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. कोकणातील बीएसएनएलचा असाच भोंगळ कारभार होता. परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडून कोकणातील प्रश्न सोडवला आहे. जर खासदार राऊत जर आपल्या मतदारसंघातील प्रश्न लोकसभेत उपस्थित करुन जर नागरिकांना न्याय देत असतील तर खासदार माने यांना हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडायला सवड नाही का? असा प्रश्न बीएसएनएलच्या ग्राहकांना केला आहे. उरलेसुरले ग्राहकसुध्दा इतर कंपन्यांचा आधार घेणार आहेत. ग्राहकांनी बीएसएनएलच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता ग्राहकांना बीएसएनएलच्या नादाला कशाला लागताय तुम्ही इतर कंपन्यांचे कार्ड घ्या, असा सल्ला दिला जात आहे. जर असे अधिकारी वागणार असतील तर ग्राहकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल ग्राहकांतुन केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!