आरोग्य व शिक्षणमावळ

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा ..

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा ..Hindi Divas Celebration at Krishnarao Bhegade English Medium School..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ सप्टेंबर.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीस इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यानी चित्र स्वरुपातील मुहावऱ्यांवर आधारीत विध्यार्थ्यांना प्रश्न विचारले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अक्सा पठाण हिने हिंदी दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यानी ‘ भाषा है मनकी ‘ हे गीत गायले, तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यानी ‘अस्फलता ‘ हे नाटक सादर केले. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यानी कवी तुलसीदास व कबीर यांचे दोहे सादर केले. हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे यांनी ‘ हिदी है हम ‘ या गाण्याचे बोल बोलून आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच खजिनदार. गौरी काकडे यांनी ‘ हिंदी भाषेचे सौंदर्य ‘ यावर आपले विचार मांडले. शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शाळेच्या सर्व हिंदी विषयाच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विध्यार्थीनी श्रेया झावरे व समृध्दी भांडलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या पर्यवेक्षिका. ज्योती सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेचे सर्व विध्यार्थी उपस्थित होते तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका. रमा बागुल,  कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!