आरोग्य व शिक्षण

लोणावळा ग्रामीण पोलीसांच्यावतीने निर्भया पथकाची स्थापना

Spread the love

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

महिला व मुलींच्या तक्रारी तसेच संरक्षणासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत आपली सुरक्षा आमचे ध्येय व कर्तव्य यावर ब्रीद वाक्याखाली महिलांना त्रास देणारे, छेडछाड करणारे, टॉन्ट मारणारे, रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करणारे, धमकावणाऱ्या तसेच वाहनात रिक्षा अथवा कोणत्याह ठिकाणी छेडछाड होत असेल तर पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क करावा यासाठी पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात आली.

महिला अथवा मुलींनी खालील क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक –

(02114) 273036/
(020) 25657171/
25657172

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!