आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

सामर्थ्य आहे चळवळीचे- जो जो करील तयाचे-परी तेथे पाहिजे अधिष्ठान ज्ञानाचे!–

Spread the love

सामर्थ्य आहे चळवळीचे- जो जो करील तयाचे– परी तेथे पाहिजे अधिष्ठान ज्ञानाचे!–There is power in the movement – of the one who will do it – there should be a foundation of knowledge!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर विशेष लेख, १९ एप्रिल.

कल्पवृक्षाच्या प्राप्तीसाठी आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना भेटलो! बरेच ग्रंथ चाळलेत पण– कल्पवृक्ष प्राप्तीच मनाला समाधान देणार असं उत्तर मला कुठेच मिळालं नाही! शेवटी या निर्णयापर्यंत पोहोचलो की– ज्याला ज्ञान प्राप्त झालेल आहे त्याच्या हाती हा कल्पवृक्ष निश्चितच त्याला गवसला आहे– मग ते ज्ञान व्यवहारातून त्याला प्राप्त होवो– व्यवसायातून वा अनुभवातून किंवा ग्रंथातून पुस्तकातून त्याला प्राप्त झालेल असेल! कदाचित त्या त्या क्षेत्रातील गुरूपासूनही त्याला मिळालं असेल! पण मित्रांनो ज्या क्षणी त्याला ज्ञान प्राप्त होतं त्याक्षणी कल्पवृक्षाची सर्व मधुरफळे त्याला चाखायला निश्चितपणे मिळतात म्हणून संपूर्ण केंद्रबिंदू आहे ते ज्ञान प्राप्ती! मित्रांनो जर तुम्हाला कल्पवृक्षाखाली बसून तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर ज्ञानाशिवाय त्या कल्पवृक्षाची प्राप्ती होणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे.

ज्यांना हा कल्पवृक्ष प्राप्त होऊन ती त्यां मधुर फळांचा आस्वाद घेताआहेत अशांचं उदाहरणच द्यायचं तर– त्यापैकी प्रथम क्रमांक आहे आमचे बंधू मोतीलाल राठी यांचे चिरंजीव मुकुंद राठी यांचंचं उदाहरण घेऊया! आमचे बंधू मोतीलाल राठी आणि भाभी शकुंतला राठी यांनी अत्यंत कष्टातून आपल्या संसाराचा गाडा चालविला होता! सर्व कुटुंबाच्या सुखदुःखात संघर्षाच्या काळात सक्षमपणे ते आपल्या मुकुंदच्या मागे उभे राहायचे याची संपूर्ण जाणीव त्यांचे चिरंजीव मुकुंदा यालाही होती म्हणून त्याने रात्रंदिवस कष्ट केले! दिवसातील अठरा अठरा तास अभ्यास केला आणि महाराष्ट्राच्या एमपीएससी परीक्षेत गोल्ड मेडल मिळवून तो यशाचा धनी झाला! आणि संपूर्ण राठी परिवाराच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला! जे जे त्यांना हवं ते ते हात जोडून त्यांच्यासमोर उभ राहील! असे अनेकजण आहेत! मी स्वतःचं एक उदाहरण आहे!मी शिकत असताना घरात पाच रुपये सुद्धा नसायचे दुर्दैवाने अशी आर्थिक परिस्थिती त्या वेळी आमची होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ज्ञानाशिवाय या प्रतिकूल परिस्थितीच परिवर्तन होणार नाहीत! रात्रंदिवस कष्ट केले सुदैवाने ठरवूनच वैद्यकीय पदवी मिळवणी! आणि आमच्या सर्व कुटुंबात अपेक्षित असं परिवर्तन घडून आलं !

 

आपल्याही परिचयात कितीतरी व्यक्ती अशाच असतील की– ज्यांनी आपल्या कष्टाच्या आणि साधनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान प्राप्त केले असेल! त्यामुळे ते नेते झाले! अभिनेते झालेत! प्रगतिशील शेतकरी कष्टकरी कामगार हे त्याच ठिकाणी मालकही झालेत! कदाचित त्यांनी कुठल्याही विद्यापीठाची पदवी प्राप्त केली नसेलही पण आपल्या कौशल्यपूर्ण अनुभवातूनच त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि कल्पवृक्षाच्या छायेत ते विसावले आहेत आणि आनंदाचे डोही आनंद तरंग घेत आहे! शेवटी मित्रांनो– ज्ञान मिळवा कल्पवृक्ष हात जोडून तुमच्यासमोर उभा राहील व मग बघा– जे जे हवं ते ते- तुम्हाला मिळेल! भाग्यवान या शब्दाचाअर्थ तुमच्याकडे पाहून त्यांना नक्कीच कळेल! हा ज्ञानरूपी कल्पवृक्ष आपल्यालाही प्राप्त हो हीच त्याच्या चरणी प्रार्थना..लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!