आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

तळेगाव दाभाडे येथे येत्या १९ ते २१ जानेवारी दरम्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे  आयोजन..

व्याख्यानमाला सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे प्रांगण, नाना भालेकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे निमंत्रक ट्रस्टचे संस्थापक  डॉ. कृष्णकांत वाढोकर यांनी दिली..

Spread the love

तळेगाव दाभाडे येथे येत्या १९ ते २१ जानेवारी दरम्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे  आयोजन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर , १७ जानेवारी.

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे येत्या 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे प्रांगण, नाना भालेकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे निमंत्रक ट्रस्टचे संस्थापक  डॉ. कृष्णकांत वाढोकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष नगरसेवक निखिल भगत, डॉ. वर्षा वाढोकर यांनी दिली.
या व्याख्यानमालेमध्ये 19 जानेवारी रोजी सिने नाट्य अभिनेते मिलिंद शिंदे यांचे ‘माझा कला प्रवास’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाचे अध्यक्ष कलापिनीचे विश्वस्त अनंत परांजपे, तर विशेष उपस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची असेल. प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे उपप्रांतपाल विलास काळोखे उपस्थित राहणार आहेत.
              व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी 20 जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत रजिया पटेल यांचे ‘भारतीय एकात्मता’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून मायमर मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नांगरे, उद्योजिका निरुपा कानिटकर यांची विशेष उपस्थिती, तर प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. असोसिएट्सच्या संचालिका सीमा कांचन कदम, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा काळोखे उपस्थित राहणार आहेत.
              तसेच २१ जानेवारी रोजी सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांचे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्मरण बलिदानाचे’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मदन बाफना असतील, तर सावा हेल्थकेअर लि.चे संचालक विशाल जाधव आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची विशेष उपस्थिती असेल. पं. सुरेश साखवळकर, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाहक चंद्रकांत शेटे, बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत भिडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
            व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता शांता कल्याणराव जाधव धोत्रे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!