ताज्या घडामोडी

वाकुर्डे सेवा सोसायटीत वाकेश्वर ग्रामविकास पॅनल विजयी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाकेश्वर ग्राम विकास पॅनेलने १३ विरुद्ध ० ने विरोधकांचा धुरळा केला. विजयी उमेदवार शामराव कृष्णा खिलारे, गजानन चंद्रु पाटील, यशवंत कृष्णा जाधव, आनंदा रामू जाधव, मारुती जाणू कांबळे, भगवान विठ्ठल जाधव, यशोदा शिवाजी पाटील, लक्ष्मी जगन्नाथ पाटील, शिवाजी बापू पावणे यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगभाऊ नाईक यांची भेट घेतली. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार नाईक व तालुक्याचे माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक यांनी अभिनंदन केले. यावेळी विश्वासचे संचालक डॉ. राजाराम पाटील, तानाजी पाटील, संजय जाधव, बाबा जाधव,सर्जेराव जाधव, रणजीत कांबळे, विजय जाधव, शामराव जाधव-परीट, मारुती पाटील, सचिन सवादकर, राजू मेंढकर, युवराज जाधव, पांडुरंग पाटील, मोहन गुरव, राहुल कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!