आरोग्य व शिक्षण

दि मुस्लिम को आॕपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान

Spread the love

लोणावळा : सुमारे अकराशे सदोतीस मतदार आसलेले दि मुस्लिम को आॕपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदान सुरू आहे.

लोणावळा नगरपरिषदेचा पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालय व उर्दू माध्यमिक विद्यालय आवारात दोन केंद्रावर मतदान होत आहे. सुमारे सतरा जागांसाठी मतदान होत असून लोणावळ्यातील एका जागेसाठी चुरस पहायला मिळत आहे.

या निवडणुकीत तीन पॕनेलतर्फे उमेदवार रिंगणात असून अवामी महाज पॕनेल डाॕ.पी.ए.इनामदार यांचे नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे. भ्रष्टाचार हटाव पॕनेल हा इम्पिहास सिकीलकर (बारामती ) यांचे नेतृत्वाखाली निवडणुकीत रिंगणात आसून तिसरा टेहरी के आवामी महाज पॕनेल हा आझिम गुडाकेवाला व एस.एम.इक्बाल याःचे नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे.

मतदारांना स्लिपा पोचल्या नसल्यामुळे मतदान बुथवर मतदार क्रमांक शोधायला मतदार सभासदांना वेळ लागत असल्याचे मतदान केंद्रावर पहायला मिळाले. मतदान केंद्रावर मतदानाचे व्हिडीओ शुटींग दोन्हीही केंद्रावर होत आहे. पञकारांना माञ येथे मतदान केंद्राध्यक्षांकडून फोटो काढण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सिताराम दुबल यांचे मार्गदर्शनाखाली एक पोलिस अधिकारी या केंद्रावर बंदोबस्त करत आहे. मतदार राजा जागा होवून योग्य उमेदवाराला मतदान करावे ,अशी काही मतदार सभासदांनी भावना व्यक्त केल्या आहेत. पुणे ,तळेगाव व इतर ठिकाणी स्थायिक झालेले मतदार या ठिकाणी मतदानाचे कामाकरीता आले आहेत,त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!