आरोग्य व शिक्षण

शासनाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांचा व्दितीय क्रमांक

Spread the love

कोरोना काळातील कार्यांची राज्य शासनाकडून दखल
सलग दुसऱ्यावर्षी सन्मान मिळवणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव शिक्षक
प्रतिनिधी
हाय्यर एज्यूकेशन सोसायटी, शिराळा संचलित गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशिल क्रीडाशिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर यांनी शासकीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये राज्यात व्दितीय क्रमांक पटकाविला.

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र शासन ,पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्ध्यमध्ये माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटामध्ये सुधीर बंडगर यांनी ” व्यायामाची धरुया कास , स्थूलता कमी होईल हमखास ” या विषयावर नवोपक्रम सादर केला होता. शासनाच्या या स्पर्ध्यत त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्थूलता वाढीची कारणे , वजन वाढीचे तोटे , उपाय ,वजन कमी करण्यासाठीचे व्यायामप्रकार , समतोल आहार तसेच ऑनलाइन व्याख्यानमाला, योग व सूर्यनमस्कार , पारंपारिक खेळाचे संवर्धन , या विषयी नाविन्यपूर्णं उपक्रम विद्यालयात राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. कोरोना शाळा बंद काळातही आपले कार्यं न थांबवता त्यांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर त्यांनी उपाययोजनात्मक अनेक उपक्रम राबविले होते. गतवर्षी ही राज्यातील टॉप टेन शिक्षकांमध्ये जिल्ह्यातून एकमेव त्यांची निवड झाली होती. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पूणे यांनी त्यांची यावर्षीही सांगली जिल्ह्यातून राज्यातल्या टॉप टेन शिक्षकांमध्ये निवड करत राज्यस्तरीय दोन फेऱ्यातून त्यांची व्दितीय क्रमांकाची निवड घोषित केली. एस.सी.ई.आर.टी. चे संचालक एम. डी .सिंह , प्राचार्य विकास गरड , प्राचार्या कमलादेवी आवटे यांच्या शुभहस्ते तर डॉ.अमोल डोंबाळे संशोधन उपविभाग प्रमुख , अमोल शिणगारे , संशोधन विभाग सहायक यांच्या उपस्थितत सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. डोंगरी , दुर्गंम ,जंगल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी बंडगर सर विविध उपक्रम राबवत आहेत . या यशासाठी त्यांना प्राचार्य रमेश होसकोटी , नवोपक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र भोई , डॉ श्रीशैलप्पा कामशेट्टी, प्रा. तुकाराम कुंभार , जिल्हा क्रीडाअधिकारी माणिक वाघमारे ,गटाशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर ,विषय साधन व्यक्ती मधुकर डवरी, संस्था चेअरमन आर . व्ही.हसबनीस , सचिव बं. चिं. दिगवडेकर संस्थेचे सर्वं संचालक , शिक्षणविस्तार अधिकारी सुनंदा पाटील ,बाजीराव देशमुख , विष्णु दळवी, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी , मुख्याध्यापक ए.एस. घोरपडे , माजी मुख्याध्यापक आर . एस.हसबनीस यांचे मार्गदर्शन लाभले.

चौकटीत – डोंगरी , दुर्गम , जंगल भागात पोहचून शिक्षण व क्रीडा प्रसार करण्याचे कार्य बंडगर सरांनी केले आहे.कोरोना संकट काळात शाळा बंद असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. डोंगरी भागातील त्यांचे क्रीडा विषयक उपक्रम विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण राज्यासाठी उपयोगी व आदर्शवत असल्यानेच आज त्यांचा राज्य शासनाने गौरव केला आहे. त्यांचे शैक्षणिक ,क्रीडा कार्यं गौरवास्पद आहे.
मा. अनिल चोरमले
उपसंचालक ,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,पूणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!