महाराष्ट्र

बहुजन विकास आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव निमित्त देहूरोड मध्ये गरीब गरजूंना अन्न धान्य किट वाटप

Spread the love

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला देहूरोड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी तर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश ओव्हाळ यांनी पुष्पहार अर्पण करून या दोन्ही महापुरुषांना आदरांजली वाहिली. यावेळी बोर्डाचे राजन सावंत व सर्व कर्मचारी, नागरीक विविध सामजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजक संजय धुतडमल यांनी प्रास्ताविक पर भाषण केले. विलास सोंडे, उमेश ओव्हाळ यांनी दोन्ही महापुरुषांबद्दल मनोगत व्यक्त केले. बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी आभार मानले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान येथील कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आयएफएस विभागीय वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रंगनाथ नाईकडे याच्या हस्ते 300 गरीब गरजू नागरीकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.जयंती महोत्सव समितीचे मुख्य संयोजक संजय धुतडमल यांनी बहुजन विकास आघाडी मार्फत राबविलेल्या विविध सामजिक उपक्रमाची उपस्थित मान्यवरांना नागरीकांना महिती दिली. या वर्षीपासून जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपद प्रत्येक वर्षी नवीन कार्यकर्त्याला देवून महापुरुषांच्या विचारधारेत सामाऊन घेणार असल्याने या वर्षी अध्यक्ष म्हणुन राजाराम अस्वरे यांची सर्वानुमते निवड केल्याचे सांगितले.

आयएफएस विभागीय वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिला रशियात गायलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा, साहित्य, लेखणी, कादंबऱ्या, पोवाडे, चित्रपट त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल शासनस्तरावरील महिती दिली. बहुजन विकास आघाडीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून आपले विचार व्यक्त केले.

यावेळी ॲड. सुशील मंचरकर, देहूरोड जयंती महोत्सव समिती चे अध्यक्ष राजाराम अस्वरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यदुनाथ डाखोरे, राष्ट्रवादी देहूरोड अध्यक्ष कृष्णा दाभोळे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शितल हगवणे, काँग्रेस आय महिला अध्यक्षा ज्योती वैरागर, कामगार नेते लहुमामा शेलार, शिवसेना अध्यक्ष भरत नायडू, मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष महादेव चौधरी, महावीर बरलोटा, किसनराव नेटके, मिक्की कोचर, उद्योजक विलास तरस, सागर लांगे, राजश्री राऊत, रंजना सपकाळ, रमेश जाधव, विलास हिनुकले, विश्वनाथ सरवदे, इत्यादी नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष विजय मोरे यांनी तर आभार जयंती महोत्सव समिती अध्यक्ष राजाराम अस्वरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृष्णा चांदणे, संजय साठे, कैलाश वारके, राजू नवगिरे, प्रतिक धुतडमल, नितीन चांदणे, विजय मासेकर, गौरव जेगरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!