आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

स्वच्छता, श्रमदानाचा ध्यास मनापासून युवकांनी अंगिकारावा ः रोहन जगताप.

कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत,विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन .

Spread the love

स्वच्छता, श्रमदानाचा ध्यास मनापासून युवकांनी अंगिकारावा ः रोहन जगताप.

आवाज न्यूज :  चिंचवड प्रतिनिधी, २ फेब्रुवारी.

कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत मुळशी तालुक्यातील सांगवडे येथे दि.१ ते ७ दरम्यान होणार्‍या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन सांगवडे येथील सरपंच रोहन जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच योगेश राक्षे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप सपकाळ या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले लायन क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे विभाग अध्यक्ष ला. हर्ष नायर, ला. संदीप पोलकम, ला. प्रशांत कुलकर्णी, ला. एकनाथ चौधरी महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. प्रिया गायकवाड, डॉ. आनंद लुंकड, पोर्णिमा अगरवाल, प्रा. पांडुरंग इंगळे, विद्यार्थी, प्रतिनिधी अनिकेत शिंदे, श्वेता वर्मा, प्रतिक्षा कलापुरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रोहन गायकवाड पुढे म्हणाले, आपण राष्ट्रीय योजनेअंतर्गत उपक्रमात सहभागी होऊन या गावात सात दिवस शिबीरार्थी माध्यमातून स्वच्छता, श्रमदान, सर्वेक्षण उपक्रम राबविणार आहात याचा मला विशेष आनंद होत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सात दिवसात तुम्हाला येथे ग्रामीण भागाचे अनुभव येतील तेच अनुभव तुमच्या आयुष्याच्या भावी वाटचालीस उपयोगी पडतील. ग्रामीण भागातील जनजीवन तुम्ही अनुभवणार आहात. येथील ग्रामस्थांना भेटून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घ्या, विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही तरुण आहात मी ऐवजी आपण या वाक्यातून सात दिवसाच्या शिबीरात अनुभव घ्या व पुढील आयुष्यात कृतीरूपी अंगिकारा असे आवाहन केले.
मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले, सांगवडे गावात सुशिक्षीत पदवीधर व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सरपंच जगताप सारखे व्यक्तिमत्व येथील गावाला मिळाला आहे, याचा विशेष आनंद होत आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेत 700 महाविद्यालये असून त्यापैकी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी शिबीराच्या माध्यमातून 7 दिवस घरापासून ग्रामीण भागात राहून तेथे श्रमदान आदी उपक्रमे राबवित एकरूप होतात. आपल्या आतील उर्जेला दिशा येथे मिळते, अशातूनच त्याचे भावी आयुष्य सुखकारक बनेल. येथे सात दिवस शिस्तबद्ध पद्धतीने राहून वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करून आपल्या महाविद्यालयाचा व स्वतः वेगळा ठसा उमठवा असे आवाहन त्याने यावेळी केले.

ला. प्रशांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला सहभागी शिबीरार्थींना दिला. प्रगतशील शेतकरी सचिन राक्षे म्हणाले, विद्यार्थ्यांना येथील शेतात या तेथील शेतकर्‍यांकडून शेती विषयक माहिती घ्या, जे जे सहकार्य हवय ते ग्रामस्थ करतील.
सात दिवस होणार्‍या शिबीरात विचार मंथन सत्रात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, अंधश्रद्धा निर्मुलनचे मिलिंद देशमुख, संजय जगताप, प्रा. वैशाली वाघोले शिबीरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत, असे कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे यांनी सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले., तर आभार प्रा. सुकलाल कुंभार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!