आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अत्यंत विषारी सर्प दंषान, मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं अविरत कार्य डॉक्टर राऊत दांपत्यां तर्फे होत आहे.

या निस्पृह जीवदायी वैद्यकीय सेवेची दखल अनेक सामाजिक संस्थांसह महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे!

Spread the love

 

पुणे नाशिक रस्त्यावर   नारायणगाव रहिवासी सन्मित्र डॉक्टर सदानंद राऊत यांच्या विघ्नहर नर्सिंग
होमला, अत्यंत विषारी सर्प दंषान, मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं अविरत कार्य डॉक्टर राऊत दांपत्यां तर्फे होत आहे.

आवाज न्यूज : नारायणगाव, वार्ताहर, २ जानेवारी.

जगात दोन प्रकारची माणस असतात ,एक सूर्यासारखी स्वयंप्रकाशित! ते इतरांच आयुष्य प्रकाशमान करतात स्वतःच्या तेजान– पण काही माणसं असतात बोधिसत्वासारखी! स्वतः कष्ट करतात! संकटांना आणि संघर्षांना स्वतः समोर जातात आणि आणि इतरांच आयुष्य प्रकाशमान करतात ,स्वतःच्या आदर्शान! त्यापैकीच आहेत आमचे सन्मित्र डॉक्टर सदानंद राऊत पती-पत्नी!
अत्यंत विषारी सर्प दंषान, मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं अविरत कार्य डॉक्टर राऊत आणि डॉक्टर  पल्लवी राऊत यांच अनेक वर्षाचं यशस्वी कार्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेल आहे.

त्यांच्या या निस्पृह जीवदायी वैद्यकीय सेवेची दखल अनेक सामाजिक संस्थांसह महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे! पोलीस भरतीच्या तयारीत असलेले सोलापूर आणि भोर येथील दोन तरुण सर्प दंषाने अत्यंत गंभीर अवस्थेत विघ्नहर रुग्णालयात दाखल झाले होते! त्यांना जीवदान देण्याच पुण्यकर्म सेवाभावी वृत्तीच्या अभ्यासू राऊत पती-पत्नींनी आपल्या कर्मचाऱ्यांसह यशस्वीपणे नुकतंच पार पडलं होतं.

डॉक्टर राऊत यांचं स्नेकबाईट रुग्णांच्या उपचाराची पद्धत जवळून बघण्यासाठी लंडनस्थित ७६ वर्षाचे प्रसिद्ध सर्जन मायकेल वॉर्न हे गेले पाच दिवस डॉक्टरांच्या समवेत वास्तव्यास होते! डॉ. भंडारी आणि सन्मित्र प्रसिद्धहास्यकवी शरदेदू शुक्ला यांनी ऍडमिट असलेल्या रुग्णांच्या मुलाखती घेतल्या.

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर!- हे ब्रीदवाक्य समोर ठेवून मी डॉक्टर राऊतांना कळकळीची विनंती केली की– डॉक्टर सदानंद राऊत सरांचं यापुढील वैद्यकीयकार्यक्षेत्र हे जगातील विषारीसर्प नष्ट करण्यासाठीच असेल. डॉक्टरांना त्यासाठी प्रचंड संघर्षाला सामोर जावं लागेल याचीही जाणीव मी त्यांना दिली.

डॉक्टर सदानंद राऊत माझ्याच आयुष्याच्या वाटेवरील स्नेहाच वृंदावन आहे! मनानं प्रसन्न वृत्तीन- दिलदार आणि ज्ञान्यांन प्रगल्भ असे धन्वंतरी म्हणून संपूर्ण पंचक्रोशीला परिचित आहेत.भविष्यातील संकल्प सिद्धीस सन्मित्र डॉ सदानंद राऊत पती-पत्नींना परमेश्वर निरामय निरोगी आयुष्य प्रदान करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.अशा शुभेच्छा लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी डॉ. दांपत्याना दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!