आरोग्य व शिक्षण

भुयारी गटाराचे कामामुळे शुक्रवारचा भाजीबाजार बंद..

क्रांतीनगर हनुमान टेकडी रस्त्यावर भरणारा बाजार रायवूड मधे घेण्याची शक्यता ?

Spread the love

भुयारी गटाराचे कामामुळे शुक्रवारचा भाजीबाजार बंद.. क्रांतीनगर हनुमान टेकडी रस्त्यावर भरणारा बाजार रायवूड मधे घेण्याची शक्यता ?

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी  २ जानेवारी.

शुक्रवारी भरणारा आठवड्याचा भाजीबाजार गटर कामामुळे ३ तारखेला बंद राहणार आहे.असे लोणावळा नगरपरिषद प्रशासनातर्फे नागरिकांना व भाजीबाजार येथील विक्रेत्यांस आवाहन करण्यात आले आहे.अचानक एक दिवसापूर्वी आठवड्याचा भाजीबाजार बंद करण्याच्या लोणावळा प्रशासनाचे भूमिकेमुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे , कारण स्वस्तात व शेतकरी ते ग्राहकांच्यापर्यत पोहोचणारा भाजीपाला भाजीमंडईतील महागात, महाग दराने घ्याव्या लागणार आहेत.ऐनवेळी भाजीबाजार बंद केल्याने भाजीविक्रेते , टेंम्पोचालक यांची फार गैरसोय होणार आहे..

भाजीबाजार रायवूड मधे भरविल्यास लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही , असे काही नागरिकांकडून सांगण्यात आले.भांगरवाडी येथे भुयारी गटाराचे काम इंद्रायणीनदी पुलांचे मधोमध रस्त्याचे मध्यावर आले आहे.मोठे खड्डे खोदून येथे त्यात सिमेंट चे सुमारे तीन फूट व्यासाचे पाईप टाकण्यासाठी येथे क्रेन , पोकलेन दिवसराञ काम करत असल्याने याचा परिणाम भाजीबाजार बंद करण्यावर होणार आहे.

एकच रस्ता भांगरवाडी व वळकाईवाडी येथे निघायला आहे, दुसरा रस्ता कैलासनगर स्मशानभूमीच्या मार्गावरून तसेच भारत साॕ मिलपासून निघतो , पण तो रस्ता अपूर्ण पडण्याची शक्यता असल्याने हा भाजीबाजार शुक्रवारी बंद राहणार आहे , असे  नगरपरिषद प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!