आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान.

राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत.

Spread the love

२१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान.राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत.

आवाज न्यूज : महाराष्ट्र वार्ताहर, २ जानेवारी.

२१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा२ते २५ मार्चदरम्यान परिक्षा होणार आहे. ज्यात औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून बारावीचे १ लाख ७८ हजार ४९९ विद्यार्थी तर दहावीची परीक्षेसाठी १ लाख ६६ हजार ९६४ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. मात्र याचदरम्यान परिक्षेबाबत मंडळाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे. जर परीक्षेला पोहोचायला उशिर झाला तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी सूचना परीक्षा मंडळाकडून दिली. परीक्षा मंडळाच्या मते, उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निरर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाकडून अशी सूचना जारी करण्यात आली.

यंदाची दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजता तर दुपारी ३ वाजता अशी पेपरची वेळ आहे. मात्र आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीरा झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. मात्र आता राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षे केंद्रावर आता विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता तर दुपारी २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!