आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

खो-खो च्या स्पर्धेत मावळ तालुका स्तरावरील ‘ चैतन्य इंटरनॅशनल स्कूलने पटकविला तृतीय क्रमांक..

पुणे जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय' व सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदूंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने, सुदुंबरे मावळ येथे, आयोजित करण्यात आला होता..

Spread the love

खो-खो च्या स्पर्धेत मावळ तालुका स्तरावरील ‘ चैतन्य इंटरनॅशनल स्कूलने पटकविला तृतीय क्रमांक..

  • आवाज  न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३ डिसेंबर.

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला खो-खो च्या स्पर्धेत मावळ तालुका स्तरावरील तृतीय क्रमांक ‘ चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) इंदोरी, दिनांक २८  व २९ नोव्हेंबर २०२२रोजी ‘पुणे जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय’ व सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदूंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने, सुदुंबरे मावळ येथे, आयोजित तालुका आंतरशालेय खो-खो स्पर्धेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वयोगटाखालील मुले प्रज्वल मराठे, साहिल शिंदे, बिशू रावत, हिमांशू सिंग ,अखिलेश यादव, साहिल रात्रे, अथर्व वीर ,समर्थ राऊत, शुभम रावत, सुप्रीम मंडल, सुजल रात्रे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

मेहनत, चिकाटी, एकाग्रता हे सर्व एकवटून सर्व खेळाडू मन लावून खेळत होते. खो-खो चा सामना खूपच चुरशीचा ठरला होता.  सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून खेळले व हे यश खेचून आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!