आरोग्य व शिक्षण

तळेगावात कोजागिरी निमित्त हासरा चंद्रमा संगीत मैफिल

Spread the love

तळेगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघ मावळ, ब्राह्मण सर्व सेवा संघ तळेगाव दाभाडे व वानप्रस्थाश्रम तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी निमित्त ‘हासरा चंद्रमा’ या संगीत मैफिलीचे आयोजन रविवार (24 ऑक्टोबर) रोजी तळेगाव शहरात करण्यात आले आहे.

वानप्रस्थाश्रमात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात बकुल पंडित, पं. विनोद भूषण अल्पे,मधुरा वेलणकर, प्रकाशराव जोशी, श्रृती देशपांडे, सुरेश कुलकर्णी, शेखर व्यास, सुरेश साखळकर ही मान्यवर गायक कलाकार मंडळी आपली सुमधुर गीते सादर करतील. यावेळी हिमांशू जोशी ऑर्गनवर तर केदार कुलकर्णी तबल्यावर साथ करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!