आरोग्य व शिक्षण

मोदीजी, तुम्ही नेहमीच पुण्यात या, त्या निमित्ताने रस्ते सुधारतील इथले  – आम आदमी

मोदीजी पावसाळ्यात तरी यायचे आम आदमीची गांधीगिरी

Spread the love

पुणे : पंतप्रधान मोदी यांच्या पुणे भेटीमुळे अचानक सर्व रस्ते चकाचक झाले ,डागडुजी झाली, साफसफाई झाली. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या काही जणांनी गांधीगिरी करत सेनापती बापट रस्त्यावर फ्लेक्स  फडकावले.

२०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला होता. तेव्हा ज्या घोषणा केल्या होत्या त्यातील कुठल्याच गोष्टी पुढे गेल्या नाहीत. शहरीकरण हे वरदान आहे असे सांगत घन कचरा , हरित क्षेत्र ,झोपडपट्टी पुनर्वसन , रस्ते पादचारी मार्ग  , नदी सुधार , पाणी अश्या १४  योजनाची आश्वासने दिली होती. परंतु गेल्या ६ वर्षात फारशी प्रगती झाली नाही. महिन्यापूर्वी अहमदाबाद भेटीनंतर नदी सुधार प्रकल्प गोष्टी अचानक वेगाने हलल्या. ही सर्व कामे अपुरी असताना मेट्रो , नदी सुधार योजनांचे उद्घाटन झाले , त्याचे भवितव्य माहित नाही . घाईने ही उद्घाटने झाली तरी त्या निमित्ताने शिवाजीनगर , कोथरूड भागातील रस्ते चकाचक झाले, कचरा साफ झाला , ड्रेनेज झाकणे बसली , रस्त्यावरील खड्डे बुजले, रंगरंगोटी झाली , स्पीड ब्रेकर सुधारले. पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेल्या स्मार्ट सिटीच्या योजना फारश्या पुढे गेल्या नाहीत तरी रस्ते थोडे सुधारले त्यामुळे आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध न करता गांधीगिरी करत ,’ मोदीजी तुम्ही असेच नेहमी पुण्यात येत राहा म्हणजे त्या निमित्ताने तरी रस्ते सुधारतील इथले ‘ असा बॅनर सेनापती बापट रोडवर फडकवला.

त्यावेळेस आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत,उपाध्यक्ष संदीप सोनावणे, शिवाजीनगर संयोजक सतीश यादव, आकाश मुनियन, विकास लोंढे , दिनेश चौधरी, कॅन्टोन्मेंट चे सईद अली, शंकर थोरात, मनोज थोरात, कैलास जाधव, शिवा पवार, गोविंद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र पंतप्रधान यांना फुल देण्याची मागणी सुरक्षा पोलिसांनी फेटाळून लावली. पंतप्रधान आता निवडणुकीच्या तोंडावर, महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आल्यावर आले , त्या ऐवजी पावसाळ्यात आले असते तर रस्ते अधिक चागले झाले असते व जनतेचा त्रास कमी झाला असता अशी उपरोधिक टीका मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!