चौघडावादक दत्तोबा शंकर पाचंगे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न होणार.
सोहळा शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आईमाता मंदिर, कासारवाडी येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
चौघडावादक दत्तोबा शंकर पाचंगे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न होणार.Sahastrachandradarshan ceremony of chouchda player Dattoba Shankar Pachange will be concluded.
आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १७ ऑगष्ट.
चौघडावादक दत्तोबा शंकर पाचंगे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, तसेच रमेश दत्तोबा पाचंगे यांच्या एकसष्ठीनिमित्त जाहीर नागरी सत्कार व मानपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आईमाता मंदिर, कासारवाडी येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस असतील. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी, डॉ. विठ्ठलराव जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अनुराधा राजहंस, भाऊसाहेब भोईर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सीताराम नरेक, कृष्णनाम महाराज, प्रदीप गोगाटे, सतीश फुगे आदी मान्यवर उपस्थित राहतील.