आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

तळेगाव जनरल हॉस्पिटल प्रांगणात 76 वा स्वातंत्र्यदिन एका आगळ्या वेगळ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न!

रोटरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

Spread the love

तळेगाव जनरल हॉस्पिटल प्रांगणात 76 वा स्वातंत्र्यदिन एका आगळ्या वेगळ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न; रोटरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ ऑगष्ट.

उत्कृष्ट रांगोळी आणि विविध सुगंधित फुलांनी सजवलेल्या झेंडावंदन स्थळी- राष्ट्रभक्तीच्या गीतांनी स्फूर्तीदायी वातावरणात सर्व मान्यवरांनी  सकाळी सव्वानऊ वाजता प्रवेश केला, नर्सिंग स्कूल चे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारीनी  उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.रोटरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यांना साथ दिली- संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  गणेशजी खांडगे  चेअरमन शैलेशभाई शहा खजिनदार विनायक अभ्यंकर डॉक्टर शालिग्राम भंडारी- रोटरी अध्यक्ष रो उद्धव चितळे ज्येष्ठ रो दीपकभाई शहा इन्कमिंग रोटरी अध्यक्ष कमलेश कारले.

त्यानंतर शैलेशभाईनी प्रमुख पाहुण्या रो रश्मी कुलकर्णी यांच स्वागत करून त्यांचा परिचय अतिशय उत्कृष्ट शब्दात करून दिला.भारतीय परंपरेनुसार प्रमुख पाहुण्या रश्मी कुलकर्णी मॅडमचं  पुष्पगुच्छ प्रदान करून संस्थेचे अध्यक्ष  गणेशजी खांडगे प्रस्ताविक केले. प्रास्ताविकात तळेगाव जनरल हॉस्पिटलचा जवळ जवळ शंभरवर्षाचा इतिहासच उभा केला. रोटरी अध्यक्ष उद्धव चितळे यांनी रोटरी आंतरराष्ट्रीय संघटनेची माहिती देऊन आपल्या आजोबांच्या जनरल हॉस्पिटलशी निगडित असलेल्या आठवणींना आपल्या मनोगतात उजाळा दिला. प्रमुख पाहुण्या रश्मी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात- आंतरराष्ट्रीय रोटरी कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. याबरोबरच शारीरिक- मानसिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या समाज बांधवांची सेवा करताना जो आनंद आम्ही अनुभवतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही हे त्यांनी प्रांजलपणे मांडले.   केवळ 100 डॉलरने गरजूंना मदत करण्याचं हे अभियान आता आंतरराष्ट्रीय रोटरीच्या भक्कम सहकार्यातून हजारो डॉलर पर्यंत पोहोचल आहे, हेही त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.भविष्यातील नेत्र रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांसाठी आर्थिक मदतीची तरतूदही याच पद्धतीने आपल्याला करता येईल असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

समारंभाची समाप्ती होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे आणि चेअरमन शैलेशभाई शहा यांनी अत्यंत महत्त्वाची एक घोषणा केली. ती म्हणजे– आजपासून तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित- सर्व साधनांनी युक्त असे फिरते नेत्र रुग्णालय- खेड- मावळ- मुळशी या तालुक्यात उपलब्ध होणार आहे. यात मोतीबिंदू तपासणी बरोबरच डोळ्यांच्या सर्व विकारावर अतिशय अल्पदरात नेत्र तज्ञांकडूनच या व्हॅनमध्ये उपचार केले जातील– जसे शासन आपल्या दारी -तसेच नेत्र रुग्णालय आपल्या दारी- याच पद्धतीनं नेत्ररुग्ण सेवा आपल्या दारी असेल, तरी सर्व गरजू गरीब रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे- 15 ऑगस्टच्या निमित्ताने संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले.

या समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करण्यापूर्वी डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी- नर्सिंगस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता त्यात त्यांनी– प्रत्येक विद्यार्थिनीने किमान-चित्रकला- गायन कला- वादन कला- रांगोळी कला किंवा क्रीडांगणावरील कोणत्याही — खेळण्याची कला- यापैकी एक तरी कला आत्मसात करण्याचा आज संकल्प सोडायचा आहे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. डॉक्टरांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.

संस्थेचे संचालक डॉक्टर किरण देशमुख यांनी प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानल्यानंतर समारंभाची सांगता झाली! हा समारंभ ज्यांच्या अथक परिश्रमाने 100% यशस्वी झाला त्यांची नावे खालील प्रमाणे– समारंभ मॅनेजमेंट- प्राचार्य मोनालिसा मॅडम- सीनियर ट्यूटर मिसेस युक्ता नलवडे , गार्गी मेहता ,स्थळ सुशोभीकरण – शिवम माने -स्नेहल बहिरट- मिसेस वर्षा सुतार- बाळू चव्हाण- रोहित थोरात- आणि अभिषेक बुगे. विद्यार्थ्यांची निशुल्क रक्त तपासणी- डॉक्टर मिटकरी आणि त्यांची टीम, या सर्वांनी खरोखरच विशेष परिश्रम घेतलेत म्हणूनच हा ध्वजवंदनाचा समारंभ सर्वार्थाने यशस्वी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!