आरोग्य व शिक्षण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष भेगडे यांच्या वतीने सहारा वृध्दाश्रमास आर्थिक सहाय्य

Spread the love

मावळ : उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्थदादा पवार फौंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने आंदर मावळातील सहारा वृध्दाश्रमास पक्के शौचालय उभारण्यासाठी १७ हजार रूपयांची मदत करण्यात आली.आंदर मावळ येथील कुसवली या गावात अनाथ निराधारांसाठी सहारा वृध्दाश्रम उभारण्यात आले आहे.

सदर ठिकाणी पक्के शौचालय उभारणेचे काम बाकी असल्याने तळेगाव नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम नगरसेवक संतोष भेगडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पार्थदादा पवार फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी १७ हजार रूपयांचा निधी याकामासाठी वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केला.सामाजिक बांधिलकी जपत भेगडे परिवाराने आपले नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या मदतीबद्दल वृध्दाश्रमाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संतोष भेगडे, श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राहुल पारगे, संचालक अनिलजी पवार, अरविंद गद्रे उपस्थित होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!