आरोग्य व शिक्षण

लोणावळा ग्रामीण हद्दीत अवैध शस्ञासह एकास अटक

Spread the love

लोणावळा : लोणावळा ग्रामिण हद्दीत पोलिसांकडून विनापरवाना शस्ञ बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून साफळा लावून आरोपीस अटक करण्यात आली. त्याचेकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.

नवनाथ एकनाथ शिंदे (वय-२४, रा-ओळकाईवाडी ,ता-मावळ) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

लोणावळा ग्रामिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी ओळकाईवाडी गावच्या हद्दीत एक तरूण अवैध शस्ञ बाळगून फिरत असल्याचे गुप्त बातमी पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांना मिळाली . त्यावरून माहितीची शहानिशा करत पोलिसांनी पोलिस निरिक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन बनकर , अनिल लवटे, पोलिस हवालदार आमित ठोसर, पोलिस नाईक गणेश होळकर , शरद जाधवर पोलिस शिपाई रहिस मुलानी, सिध्देश्वर शिंदे, यांचे पथकाने ओळकाईवाडीतील रिक्षास्टँडजवळ सदर तरूणाचा शोध घेतला असता तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली.त्याची अंगझडती घेतली असता कंबरेस गावठी पिस्टल मिळून आले.

त्याचेवर अवैधरित्या शस्ञ बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ महाराष्ट्र पोलिस आधिनियम कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसून त्यास अटक करण्यात आली आहे.वडगा न्यायालयाने त्यास ता.२६ पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक  मोरे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!