आरोग्य व शिक्षण

शिरदेमध्ये विजेचा धक्का बसल्याने दोघांचा मृत्यू

Spread the love

कामशेत : येथील उकसान पठारावरील मेढिमाळावर बैल शोधायला गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. शिरदे गावातील एक विद्यार्थी व एक तरुण मृत्युमुखी पडले आहेत.

अविनाश खेमाजी बगाड (वय 16) रा. शिरदे व रवींद्र सिताराम बगाड (वय 23) रा. शिरदे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार लहू बगाड, जयदास बगाड, समीर बगाड, अजय बगाड, साईनाथ बगाड, अविनाश बगाड, रवींद्र बगाड हे सात जण 4 तारखेला रात्री बैल शोधण्यासाठी उकसान पठार मेढीमाळ येथे गेले होते. त्यावेळी त्यातील दोघांना विजेचा धक्का बसून त्यांचा अंत झाला.

या दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कामशेट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!