आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामुहिक प्रयत्नातूनच जनजागृती शक्य आहे ः क्विकहील फाऊंडेशन अध्यक्षा अनुपमा काटकर.

Spread the love

सामुहिक प्रयत्नातूनच जनजागृती शक्य आहे ः क्विकहील फाऊंडेशन अध्यक्षा अनुपमा काटकर.Public awareness is possible only through collective efforts: Anupama Katkar, President, Quickheal Foundation.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी 03 मार्च.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या सहकार्याने व क्विकहील फाऊंडेशनच्या पुढाकाराने महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षतेसाठी सायबर शिक्षा’ अभियान राबविण्यात आले. त्यात प्रशिक्षण, स्पर्धाचा समावेश होता.

यात शारदाबाई पवार महाविद्यालय, डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, एम.आय.टी. आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, अण्णासाहेब मगर कॉलेज, के.बी. जोशी कॉलेजमधील स्पर्धेत यशस्वी झालेले शिक्षक व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा योध्दा पुरस्कार मिळाले, त्यात पृथ्वी गाडेकर, भाग्यश्री दभाटे, अमृता मोरे, अंजली शुक्ला, अंकिता भागडे, निकीता होगाले, अथर्व दिघे, श्वेता वर्मा, अपेक्षा शिंदे, प्रतिक्षा जगताप यांनी क्विकहिलच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, सी.एस.आर. इनिशिएटिव्हचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय शिर्के, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, समन्वयिका डॉ. जयश्री मुळे, संयोजिका डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. अस्मिता कुर्‍हाडे, प्रा. उज्वला फलक आदींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते भव्य चषक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

क्विकहिल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर पुढे म्हणाल्या, क्विकहिलच्या वतीने जनहिताचे उपक्रमे राबविण्याचा मुळ हेतू भविष्य सुरक्षित करणे, हा आहे. सायबर सुरक्षीतेबद्दल जागरुकता व्हावी, यासाठी आम्हाला महाराष्ट्र सायबर सेल, पोलीस यंत्रणा आदींनी सहकार्य केले. त्यामुळे 29 लाखाहून अधिक नागरीकांपर्यंत जागरूकता करण्यात आली. त्यात शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. त्याचे विशेष आभारही त्यांनी व्यक्त केले.

 

अजय शिर्के म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले. सोशल मिडीयात तरुणांमध्ये नैराश्य वाढले. याचा सरासार विचार करून प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे सायबर जनजागृती अनेकांच्या सहकार्यामुळे नागरिकांत आज वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. सायबरद्वारे फसवणूक झाल्यावर नेमके करायचे काय? याबाबत भिती आहे, त्यासाठी तज्ञाकरवी जनजागृती करण्यात येत आहे.

डॉ. दीपक शहा म्हणाले, सामाजिक जबाबदारी ओळखून क्विकहील फाऊंडेशन व त्याचे सहकारी अथक प्रयत्नाद्वारे विविध स्तरावर जनजागृतीचे उपक्रमे विविध भागात राबवित आहे. अशा उपक्रमाची काळाची गरज आहे. क्विकहील फाऊंडेशनचे योगदान अमूल्य आहे. भविष्यात जनजागृती व जनहितासाठी जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले.यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, समन्वयिका डॉ. जयश्री मुळे, डॉ. भूपाली शहा, डॉ. राजेंद्र कांकरीया आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी केले. तर, आभार डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!