ताज्या घडामोडी

मैनोद्दीन शेख राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानीत

Spread the love

लातूर : – मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार मा.श्री.विक्रमजी काळे यांचे खंदे समर्थक तथा भोई समुद्रगा येथील कै.पंढरीनाथ पिचारे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मैनोद्दीन शेख यांना राज्यस्तरीय शिक्षणभुषण पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा राज्यस्तरीय शिक्षण भुषण पुरस्कार मा.श्री.मैनोद्दीन शेख यांना प्राप्त झाल्याबद्दल पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. निलेशजी लंके यांच्या हस्ते श्री शेख यांना शाल,श्रीफळ,फेटा,व सम्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
🔹अहमदनगर शहरातील माऊली संकुलच्या भव्य सभागृहात बिजमाता पद्मश्री मा.राहीबाई पोपेरे व सरपंच सेवा संघाचे संस्थापक मा.श्री.यादवराव पावसे यांच्या उपस्थिती संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार निलेश लंके यांच्या हस्ते श्री.शेख यांना सन्मानीत करण्यात आले.
🔹यावेळी व्यासपिठावर ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष मा.श्री.एकनाथ ढाकणे,सरपंच सेवा संघाचे युवा नेते मा. श्री.बाबासाहेब पावसे महाराष्ट्र होमीओपॅथी मेडीकल कॉलचे अध्यक्ष मा.डॉ.राधेश्याम गुंजाळ ह.भ.प.मा.श्री.राजेंद्र गरूड महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
🔹 सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात आपले भरीव योगदान देणारे कुशल प्रशासक तथा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मा.श्री.मैनोद्दीन शेख यांना यापुर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
🔹श्री.शेख यांच्या यशदायी कारकिर्दीस शिक्षक आमदार मा. श्री.विक्रम काळे,जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.बाबुराव देशमुख,सचिव मा.डॉ.व्यंकटराव एलाले व समस्त संचालक मंडळ, मा.प्रा. अंकुश नाडे,माजी मंडळ सदस्य मा. श्री.तानाजी पाटील,राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.मदन धुमाळ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.श्री.राम व्यंजने जिल्हा सचिव मा.श्री.दयानंद कांबळे,वसंतराव काळे खाजगी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मा.श्री.युवराज शिंदे सचिव प्रा.तानाजी भोसले राष्ट्रवादी शिक्षण संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.गंगाधर आरडले कै.पंढरीनाथ पिचारे विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!