ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायत मार्फत महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शहरातील महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी व या महिला स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभा राहून एक खंबीर नारीशक्ती म्हणून नावारूपास याव्यात या हेतूने शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत महिला व बालकल्याण विकास निधी अंतर्गत महिला वाहक (Conductor) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत शिराळा नगरपंचायतच्या वतीने सवेरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शिराळा मार्फत शहरातील महिलांना वाहक प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार व या प्रशिक्षणासाठीचे नगरपंचायत मार्फत देय असलेले अनुदान वितरण सोहळ्याचे आज दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शिराळा नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या अनुषंगाने नगरपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत सहभागी महिलांचे कौतुक करत या प्रशिक्षणामुळे त्याना होणाऱ्या भविष्यकालीन शाश्वत फायद्याची कल्पना दिली तसेच यापुढेही नगरपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनामध्ये कार्यालयाचे संपूर्ण योगदान लाभण्याची ग्वाही देत त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यानंतर सवेरा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक शब्बीर मुल्ला यांनी आपल्या मनोगतात नगरपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशासकांचे आभार मानले.शिराळा नगरपंचायत मार्फत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या स्नेहल हिरुगडे, हिना इम्रान शिकलगार, अंकिता सुभाष निकम, मोहिनी बाळासो कदम यांना शिराळा नगरपंचायत मार्फत प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र, वाहक परवाना प्रमाणपत्र, व पुष्प रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिराळा नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी व सवेरा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!