ताज्या घडामोडी

डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात ‘भेषज सुरक्षा २०२२’ हा राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

Spread the love

मा. श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र येथे आयुर्वेदाच्या औषधींबद्दल महत्वाचा असा भेषज सुरक्षा २०२२’ हा नॅशनल वेबिनार ऑन फार्मेकोव्हिजीलन्स ऑफ आयुर्वेदिक ड्रग्ज ‘ उत्साहात संपन्न झाला. या राष्ट्रीय वेबिनारसाठी भारतातील अठरा राज्यांमधून एकूण 921 अध्यापक, डॉक्टर्स, विद्यार्थी, फार्मसी क्षेत्रातील तज्ञ यांनी नोंदणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र , कर्नाटक,गुजरात ,राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू , केरळ, गोवा, आंध्रप्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब, तेलंगणा ,उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांतून नोंदणी झाली होती. या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन एन. सी .आय. एस.एम. चे आयुर्वेद बोर्डाचे अध्यक्ष डॉ.बी.एस. प्रसाद यांनी केले. जामनगर गुजरात येथील आय.टी. आर. ए.चे डीन प्रा.वैद्य रवीनारायण आचार्य यांनी ‘नॅशनल फार्मेकोव्हिजीलन्स प्रोग्राम ए.एस.यु. ड्रग्ज’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व टिळक आयुर्वेद पुणे येथील प्रा. डॉ.अपूर्वा संगोराम यांनी ‘कन्सेप्ट ऑफ फार्मेकोव्हिजीलन्स इन आयुर्वेद नीड, चॅलेंज ॲंड रिलेव्हन्स ‘या विषयावर मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय वेबिनारसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांची मान्यता मिळाली होती व विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, साताराचे प्राचार्य डॉ.विलास जगताप उपस्थित होते. तसेच या वेबिनारसाठी आइ.पी.जी. टी.ॲंड आर. ए. जामनगर येथील फार्माकॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.बी. रवीशंकर व वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी चेअरपर्सन म्हणून काम पाहिले .या राष्ट्रीय वेबिनारसाठी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष मा. श्री.अण्णासाहेब डांगे (आप्पा),संस्थेचे सचिव ॲड.राजेंद्र डांगे, कार्यकारी संचालक प्रा आर.ए.कनाई यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाली हे या वेबिनारचे कन्व्हेनर होते .या राष्ट्रीय वेबिनारसाठी महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशनल फार्मेकोव्हिजीलन्स सेलचे कॉर्डिनेटर डॉ. महेश इनामदार यांनी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून काम पाहिले व स्वागत प्रास्ताविक केले . कॉर्डिनेटर डॉ.स्मिता लोखंडे व कोकॉर्डिनेटर डॉ. रूपाली पाटील व डॉ. जयंत मरपल्लीकर यांनी काम पाहिले. सदर वेबिनारसाठी डॉ.जयवंत खरात, डॉ. विजय डांगे, डॉ.शंकर माने, डॉ.श्रध्दा शेळके , डॉ.अमित पेठकर, डॉ. अंजली उपाध्ये ,तंत्रज्ञ राजवर्धन शिंदे, प्रसाद बागणे, इंद्रजीत नांगरे यांचे सहकार्य लाभले .संपूर्ण वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ.स्नेहा टकले यांनी केले.सदर वेबिनार उत्तम झालेल्याच्या प्रतिक्रिया सहभागी प्रतिनिधींकडून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!