आरोग्य व शिक्षण

तळेगाव शहराचे प्रवेशद्वार लिंबफाटा रस्ता अंधारात

Spread the love

तळेगाव : तळेगाव शहरात प्रवेश  करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी लिंब फाटा रस्त्याचा वापर नागरिक करतात. परंतु गेले काही दिवसांपासून ह्या रस्त्यावर दिवे नसल्याने हा रस्ता अंधारात आहे .

या अंधारमय रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहन चालवताना त्रास होतो.तसेच याठिकाणी अपघाताची शक्यताही यामुळे बळावली आहे. तसेच कामगारांनाही अंधारातच घर किंवा कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे.

सायकलस्वार व पायी जाणाऱ्यांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रॉफिट प्लाझा शेजारून जाणाऱ्या सर्विस रोडवरील पाच पैकी केवळ एक दिवस सुरू असला तरी तो झाडाच्या फांद्यांनी झाकला गेल्यामुळे त्याचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते  त्यामुळे या मार्गावरील पथदिवे लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!