आरोग्य व शिक्षण

गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आयडीसीचे माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त १९ जुलैला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या वतीने काकडे यांच्या वाढदिवशी (१९ जुलै) इंद्रायणी महाविद्यालयात सकाळी 10 वाजत शिबिर घेण्यात येईल. तळेगाव दाभाडे येथील गरवारे ब्लड बँकेच्या सहकार्याने शिबीर पार पडेल.

कोविड१९ च्या राष्ट्रव्यापी महासंकटामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. राष्ट्रहित जोपासत, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!