लोणावळा ते श्रीक्षेञ मढी पायी कावडीचे भांगरवाडी येथील श्रीमारूती मंदिरापासून प्रस्थान..
ओम चैतन्य कानिफनाथ सिध्दी मंडळ यांचे यंदाचे २२ वे वर्ष आहे.
लोणावळा ते श्रीक्षेञ मढी पायी कावडीचे भांगरवाडी येथील श्रीमारूती मंदिरापासून प्रस्थान;ओम चैतन्य कानिफनाथ सिध्दी मंडळ यांचे २२ वे वर्ष आहे.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी २८ ऑगष्ट.
कुरवंडे , नागफणी , लोणावळा ते श्रीक्षेञ मढी पायी कावडीचे भांगरवाडी येथील श्रीमारूती मंदिरापासून वाजतगाजत प्रस्थान झाले. ओम चैतन्य कानिफनाथ सिध्दी मंडळ,भांगरवाडी , लोणावळा यांचे हे २२ वे वर्ष आहे.
श्रीक्षेञ मढी येथे जाण्यासाठी ता.२४ रोजी कुरवंडे , येथील नागफणी जवळून पविञ इंद्रायणीनदी चे जल भरलेली कावड सर्व नाथभक्तांचे सहकार्याने संस्थापक अध्यक्ष मंगेशभाऊ शेलार यांनी सर्व सहकारी व उत्सव अध्यक्ष प्रशांत पांगारे (पाटील ) यांचे सहकार्याने आणली. ता.२५ श्री च्या पादुका व कावडीचे विधिवत पूजा, आरती, अभिषेक येथील मारूती मंदिराजवळ श्रीकान्होबा अस्तन्याचे जवळ करण्यात आला. मान्यवरांचे व भाविकांकडून दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व कावड आणि पादुका यांचे वाजतगाजत प्रस्थान करण्यात आले.
पहिला विसावा संत तुकाराम महाराज झाडाजवळ आरतीनंतर , महाप्रसाद घेवून सर्वांनी तळेगाव येथे म्हाळसकर वाडी येथे मुक्कामाला पोहोचले.
यावेळी ता.२६ रोजी साबळेवाडी प्राथमिक शाळा , हायवेजवळ मुक्काम केला.ता.२७ रोजी ओम चैतन्य कानिफनाथ मंदिर गव्हाणवाडी , घोडनदी , शिरूर येथे मुक्काम असून ता. २८ रोजी श्री गुरूदत्त मंदिर ,चास ,कामरगाव ,गुरूदत्त ढाबा ,हायवेजवळ मुक्काम आहे.
ता.२९ रोजी मंगल कार्यालय , करंजीरोड येथे मुक्काम आहे.
ता.३० रोजी श्री क्षेत्र मढी येथे कावडीचे आगमन श्रीगुरूदत्त आश्रम , मढी , पूर्व बाजूला , ता ३१ रोजी श्रीक्षेञ गर्भगिरी पर्वत येथे मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिराजवळ मुक्काम असून ता.१ रोजी श्रीगुरूदत्त आश्रम छबिना पालखी सोहळा होईल.
गुरूवर्य माधवनाथजी महाराज यांचे आशिर्वाद असलेल्या या पायी पविञ इंद्रायणीनदी चे जल असलेल्या कावडीचे मानकरी गोविंद नामदेव मानकर आहेत.या मंडळाचे संस्थापक मंगेशभाऊ शंकर शेलार, असून उत्सवाचे अध्यक्ष प्रशांत विष्णू पांगारे आहेत.
उपाध्यक्ष शुभम हुलावळे, अभिजित केदारी , सेक्रेटरी विश्वनाथ शिंदे , राजू गायकवाड, सोमनाथ हुलावळे , झेंडेकरी भरत शेटे, विणेकरी ह.भ.प.सुदाम महाराज Shubh , खजिनदार अमोल वायकर , उपखजिनदार आनंद जाधव, सचिन शिंदे , तसेच अनेक मान्यवरांमधे राजू मापारी , अमर शेलार आदी मान्यवर सदस्य आहेत.