क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

कलापिनी कुमारभवनच्या मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या CRPF च्या छत्तीसगड येथील जवानांना पाठवल्या.

Spread the love

कलापिनी कुमारभवनच्या मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या CRPF च्या छत्तीसगड येथील जवानांना पाठवल्या.The children of Kalapini Kumar Bhavan sent self-made rakhis to CRPF jawans in Chhattisgarh.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ ऑगष्ट.

देशाबद्दलचे प्रेम आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं रक्षण करणाऱ्या जवानांबदद्लचा सन्मान मुलांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी कलापिनी कुमारभवनच्या छोट्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या CRPF च्या छत्तीसगड येथील जवानांना पाठवल्या. आपल्या कलापिनीचे पालक असणारे जवान ,केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे जी.डी. हेड कॉन्स्टेबल.आनंदा नामदेव साळूंखे यांच्याकडे या राख्या सुपुर्त करण्यात आल्या. आणि मुलांतर्फे जवानांसाठी चिक्कीचा खाऊ, मुलांनी काढलेली चित्रे , स्वरचित कविता इ. सुद्धा पाठविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलापिनीच्या कार्याध्यक्षा व कुमारभवन च्या प्रमुख.अंजली सहस्त्रबुद्धे यांनी केले. मुलांना सैनिकांची,त्यांच्या अवघड अश्या कामगिरीची माहिती व्हावी,त्यांच्या समोर उत्तम आदर्श निर्माण व्हावेत यासाठी कलापिनी नेहेमीच वेगवेगळे उपक्रम घेत असते. यावेळी मुलांनी देशप्रेमाची गाणी त्यांच्यासमोर सादर केली. यावेळी सर्व जवानांचे प्रतिक म्हणून आनंदा साळूंखे यांना विद्या अडसुळे व काही मुलींनी राख्या बांधून त्यांचे औक्षण केले.

त्यानंतर  साळूंखे यांनी मनोगत व्यक्त केले. छत्तीसगढ सारख्या नक्षलवादी भागात सतर्क राहून डोळ्यात तेल घालून राहावे लागते,ऐनवेळी निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा लागतो याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि पुढच्या सुट्टीत आल्यावर जास्ती माहिती देण्यासाठी नक्की येईन असे आश्वासन त्यांनी दिले.आनंदा साळूंखे यांचा मोठा मुलगा ओम ह्या कलापिनी कुमार भवन मध्ये नियमित येणाऱ्या मुलाचे गेल्या वर्षी असाध्य रोगामुळे निधन झाले. त्यांनी त्याच्या स्मरणार्थ कलापिनीस रोख रक्कम स्वरूपात देणगी दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आनंदा साळुंखे, मीनल साळुंखे आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय कुलकर्णी यांनी मानले, सर्वात शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!