मावळसामाजिक

विसापूर किल्ल्यावर वाट चुकलेल्या, गंभीर जखमी युवकासाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस.

शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पाटण ग्रामस्थ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Spread the love

विसापूर किल्ल्यावर वाट चुकलेल्या, गंभीर जखमी युवकासाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस ; शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पाटण ग्रामस्थ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ ऑगष्ट.

विसापूर किल्ल्यावर वाट चुकलेला युवक खाली कोसळल्याने त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला होता. मुक्का मार लागलेला, तसेच हनुवटीला मार लागलेला, दात पडलेले होते.नीट चालताही येत नव्हते. वाटेत, चिकट शेवाळ, दगड, चिखल, दाट झाडी झुडपे. यामध्ये त्याला चालवणे योग्य नव्हते. त्यामुळे स्ट्रेचरमधून रात्री १२ वाजता त्याला खाली आणले. शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पाटण ग्रामस्थ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन पाटील, शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, उतारेश्वर सुरवस हे चार मित्र पुण्याहून (मुळचे सर्व मिरज सांगली) किल्ले विसापूर येथे रविवारी (दि. २७) दुपारी एक वाजता फिरायला आले. सायंकाळी पाच वाजता यातील अर्जुन पाटील हा इतर मित्रांपासून बाजूला चालत गेला व वाट चुकला. मी खाली गावाकडे चाललो आहे, असा पहिला फोन सोबतच्या मित्रांना केला. थोड्या वेळाने मी पडलो आहे, मला मदतीला या असा फोन केला. यामुळे सर्वच गोंधळले.

मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मित्र त्याला शोधत खाली गावापर्यंत आले. गावातील लोकांना घडलेली घटना सांगितली व गावातील काही तरुण अर्जुनला शोधण्यासाठी निघाले. त्याचवेळी शिवदुर्ग रेस्क्यू टिमला सात वाजता मेसेज आला होता. रात्री ९.२० ला स्थानिक लोकांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले. परिस्थिती लक्षात घेऊन शिवदुर्ग रेस्क्यू टीम व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य तत्काळ विसापूर किल्ल्याच्या दिशेने निघाले. त्याला स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचरमधून खाली आणले.

या मदतकार्यात शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य योगेश उंबरे, प्रणय अंभूरे, कुणाल कडू, रतन सिंग, आदित्य पिलाने, सिद्धेश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे, रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे व पाटण ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!